कळंब – समय सारथी
आगाज फाउंडेशन आणि आझाद ग्रुप कळंबच्यावतीने यावर्षीपासून समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्याला स्व. सलिमभाई मिर्झा राज्यस्तरीय समाजरत्न पुरस्कार देण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. स्व. सलिमभाई मिर्झा यांनी कळंब शहर आणि परिसरात समाजातील विविध घटकासाठी कार्य करत मोठे योगदान दिले आहे. त्यांनी कळंब नगरपालिकेत 35 वर्ष नगरसेवक म्हणून जनतेची सेवा केली आहे. तसेच ते राज्यपाल नियुक्त उपनगराध्यक्ष आणि तेरणा सहकारी साखर कारखान्याचे संचालक देखील राहिले आहेत. यादरम्यान त्यांनी सामाजिक सलोखा ठेवत मोठं कार्य केलं आहे. त्यांच्या या कार्याची आठवण पुढे देखील राहावी म्हणून आगाज फाउंडेशन आणि आझाद ग्रुप कळंबच्यावतीने समाजात झोकून देऊन समाजासाठी कार्य करणाऱ्याना दरवर्षी त्यांच्या नावाने पुरस्कार देण्याचे जाहीर करण्यात आले आहे.
दरवर्षी मोहम्मद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त (ईद-ए-मिलाद) कार्यक्रम घेऊन या पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे. रोख 5001/- रुपये सन्मानपत्र आणि सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात येईल, अशी माहिती मुस्तान मिर्झा यांनी दिली. लवकरच पुरस्कार प्राप्त व्यक्तीची घोषणा केली जाईल, असं देखील म्हणाले.