धाराशिव – समय सारथी
रूपामाता उद्योगसमूह संचालित देवसिंगा (तूळ) ता. तुळजापूर येथील मनोरमा रूपामाता शुगर्स ( यूनिट क्र 3) या गूळपावडर कारखान्याच्या 2024-25 वर्षीच्या गळीत हंगामाच्या बॉयलर प्रदीपन सोहळ्याचे तसेच उस पिक परिसंवाद व भव्य शेतकरी मेळाव्याचे आयोजन रूपामाता उद्योग समुहाच्या वतीने 10 ऑक्टोबर रोजी कारखानास्थळावर सकाळी 10.30 वाजता करण्यात आले आहे.
नांदगाव ता.तुळजापूर येथील विरक्त मठाचे स्वामी श्रीमणी राजशेखर महास्वामीजी, हभप ॲड.पांडुरंग महाराज लोमटे, हभप बाबुराव पुजारी यांच्या शुभहस्ते बॉयलर प्रदीपन होणार असून वसंतदादा शुगर इंस्टीट्यूट पुणे येथील कृषिवेत्ता डॉ.गणेश पवार हे आधुनिक उस लागवड व खोडवा व्यवस्थापन या विषयावर शेतकर्यांाना मार्गदर्शन करणार आहेत. तुळजापूर तालुक्यातील प्रगतिशील शेतकरी हे देखील शेतकर्यांेना उसपीकासंदर्भात मार्गदर्शन करणार आहेत.
धाराशिव जिल्हापरिषदेचे माजी उपाध्यक्ष श्री. सुधाकर गुंड (गुरुजी) या कार्यक्रमाच्या अध्यक्ष्यस्थानी असून, या कार्यक्रमात कारखाना परिसरातील ऊस उत्पादक शेतकर्यांानी अधिकाधिक उपस्थिती दर्शवून, मान्यवरांच्या बहुमोल मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन रूपामाता उद्योगसमूहाचे संस्थापक अध्यक्ष ॲड व्यंकटराव गुंड, पाडोळीकर यांनी केले आहे.