धाराशिव – समय सारथी
कोणतीही नैसर्गिक आपत्ती संकट आले की राष्ट्रीय स्वयंसेवक संघ दक्ष होऊन नागरिकांच्या मदतीला धावून येतो, याचाच प्रत्यय धाराशिव जिल्ह्यात अनुभवायला मिळाला आहे. अतिवृष्टी व पुरामुळे उद्भवलेल्या नैसर्गिक संकटावर मात करण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ सक्रियपणे मदत कार्यात उतरला आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ सेवाभरतीच्या वतीने परंडा तालुक्यातील अनेक गावात पूरग्रस्तांना अन्न तसेच वैद्यकीय सेवा पुरवण्याचे काम शेकडो स्वयंसेवक अहोरात्र मेहनत घेऊन करत आहेत.
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सर्व प्रकारच्या वैद्यकीय औषधी गोळ्या यांची देखील सेवा संघ स्वयंसेवक नागरिकांपर्यंत पोहोचवत आहेत.या पूरग्रस्तांच्या मदतीसाठी पुढच्या टप्प्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने या आपत्तीग्रस्त कुटुंबांना जीवन उपयोगी वस्तू भांडी, कपडे तसेच किराणा किटचे वाटप करण्यात येणार आहे.
परंडा तालुक्यातील देवगाव, वडनेर,कारंजा, लाखी, वाघेगव्हाण, लोहारा, पिठापुरी येथील स्थलांतरित,आणि पुराच्या पाण्याने बेघर झालेल्या नागरिकांना अन्नाची पाकिटे, बिस्किटे,पाणी तसेच शिजवलेली खिचडी स्वयंसेवकांनी दिली आहे.
देवगाव येथे 70, वडनेर येथे 60, कारंजा येथे 70 कुटुंबांना अन्नाची पाकिटे यासोबत बिस्किट,फरसाण पाणीबॉटल,नायलॉन चिवडा वाटप करण्यात आला. स्वयंसेवकांनी ही अन्नाची पाकिटे 200 लोकांपर्यंत पोहोचवली. लाखी येथे फरसाण, बिस्किट ,पाणी बॉटल, शाबू चिवडा 35 कुटुंबांना वाटप करण्यात आला.या सेवा कार्यामध्येमध्ये स्वयंसेवक सहभागी होते. लोहारा व वाघेगव्हाण येथील 25 कुटुंबे मंगल कार्यालयात स्थलांतरित करण्यात आली होती. त्यांना शाबू चिवडा, फरसाण,बिस्किटे, पाणी बॉटल वाटप करण्यात आले.
देवगाव येथे किराणा किट वाटप करण्यात आले.यामध्ये 23 कुटुंबांना किराणा किट देण्यात आले यामध्ये स्वयंसेवकांनी मदत केली. पिठापुरी येथे किराणा किट 17 कुटुंबांना देण्यात आले. लाखी येथे खिचडी बनवून 35 कुटुंबांना वाटप करण्यात आली.वडनेर येथे शाबू व शेंगदाणे हे चाळीस कुटुंबांना वाटप करण्यात आले. यामध्ये 13 स्वयंसेवकांनी सहभाग घेतला.वाघेगव्हाण येथे 60 कुटुंबांना 19 स्वयंसेवकांच्या मार्फत किराणा किट वाटप वाटप करण्यात आले.कारंजा येथे 60 कुटुंबांना 9 स्वयंसेवकांमार्फत किराणा किट वाटप करण्यात आले.