धाराशिव – समय सारथी
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला यावर्षी शंभर वर्ष पूर्ण होत आहे. या शताब्दी वर्षानिमित संघ स्वयंसेवक वर्षभर विविध कार्यक्रम करणार आहे, त्यामुळे स्वयंसेवकात उत्साहाचे वातावरण आहे. विजयादशमी उत्सव हा संघाच्या सहा उत्सवांपैकी एक उत्सव आहे.
दरवर्षीप्रमाणे याही वर्षी धाराशिव शहराचा विजयादशमी उत्सव हा परिमल मंगल कार्यालय येथे 5 ऑक्टोबर रोजी रविवारी सायंकाळी 7 वाजता संपन्न होत आहे. या उत्सवासाठी प्रमुख पाहुणे म्हणुन सौ. प्रतिभा सतिश मोदानी आणि प्रमुख वक्ते डॉ. जयंतीभाई भाडेसिया, मा. संघचालक पश्चिम क्षेत्र, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हे असणार आहेत. सदंड संचलन हे 5 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 5. 30 वाजता डायट कॉलेज बार्शी नाका धाराशिव येथून होणार आहे.
अन्याया विरूद्ध लढणाऱ्या या हिंदु समाजाच्या शक्तीला स्फुरण देणारा दिवस म्हणजे विजयादशमी. विजयादशमी हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा स्थापना दिवस. या वर्षीच्या विजयादशमी उत्सवाचे महत्व अनन्य साधारण आहे, या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी सर्वांनी m विजयादशमी उत्सवास सहकुटुंब व मित्र परिवारासह अधिकाधिक संख्येने उपस्थित राहून संघटित हिंदू शक्तीचे दर्शन घडवावे असे आवाहन केले आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची नमस्ते सदा वत्सले मातृभूमे त्वया हिन्दुभूमे सुखं वर्धितोऽहम् । महामङ्गले पुण्यभूमे त्वदर्थे, पतत्वेष कायो नमस्ते नमस्ते ही प्रार्थना अर्थासहित ध्वनी चित्रफीतीचे लोकार्पण संघ स्थापना दिवशी करण्यात आले आहे, संघ शताब्दी वर्षानिमित्त वर्षभर कार्यक्रम राबवित आहे.