धाराशिव – समय सारथी
सोलापूर छत्रपती संभाजीनगर राष्ट्रीय महामार्गवर चारचाकी गाड्या अडवून महिलासह अन्य प्रवाशांना मारहाण करीत लुट केल्याची घटना कावलदरा येथील परिसरात पहाटे 4 च्या दरम्यान घडली घडली होती. या दरोड्याचा थरार CCTv मध्ये कैद झाला होता, त्यामुळे मतपासात मदत झाली. 7 जणांच्या सशस्त्र टोळीने मारहाण करीत लुट केली यावेळी इतर वाहने रस्त्यावरून जात होती मात्र कोणीही गाडी थांबवली नाही. संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला असून, यात मारहाण, गोंधळ आणि इतर वाहने त्या ठिकाणी जात असतानाचे दृश्य स्पष्ट दिसून येतात. पोलीस या घटनेचा तपास करीत 4 जणांना अटक केली तर 3 जन फरार आहेत.
दरोडेखोर यांच्या या टोळीने 4 ते 5 गाड्यांना थांबवून त्यातील महिला, पुरुष व लहान मुलांनाही मारहाण केली. प्रवाशांकडून सोन्याचे दागिने, मोबाईल फोन्स, रोकड, लॅपटॉप आदी वस्तू लुटण्यात आल्या. काही प्रवासी किरकोळ जखमी झाले असून मोठा अपघात टळला.दरोडेखोरांनी वाहनांपुढे अडथळे टाकून टायर फोडले. त्यानंतर वाहन थांबताच प्रवाशांवर हल्ला चढवण्यात आला.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी वेगाने तपास सुरू केला. चार आरोपींना येडशी टोल नाक्यावर ताब्यात घेण्यात आले. हे आरोपी तेरखडा परिसरातील असून, पूर्वीचे रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याची माहिती आहे. उर्वरित तीन आरोपी फरार असून, त्यांचा शोध सुरू आहे. तपास पोलिस निरीक्षक शेळके यांच्या नेतृत्वाखाली सुरू आहे.