धाराशिव – समय सारथी
धाराशिवचे उपविभागीय अधिकारी संजयकुमार डव्हळे यांच्या विरोधात धाराशिव जिल्ह्यातील तहसीलदार, नायब तहसीलदार, अधिकारी व कर्मचारी संघटना आक्रमक झाल्या असुन त्यांनी जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांना लेखी निवेदन देत कारवाईची मागणी केली आहे. निवासी उपजिल्हाधिकारी शोभा जाधव, तहसीलदार जयवंत पाटील, अरविंद बोळंगे,निलेश काकडे, गोविंद येरमे,रणजीतसिंह कोळेकर यांच्यासह कळंब, वाशीचे तहसीलदार उपस्थितीत होते. अधिकारी व कर्मचारी यांनी जिल्हाधिकारी यांची भेट घेत भावना मांडत भुमिका स्पष्ट केली. धाराशिव तहसीलदार कार्यालयात 31 डिसेंबर रोजीपासुन कामबंद आंदोलन सुरु असुन ते 1 जानेवारी रोजी सुरु राहणार आहे, या आंदोलनात जिल्ह्यातील सर्व अधिकारी व कर्मचारी संघटना सहभागी होणार असुन त्यांनी आंदोलनाला पाठिंबा दिला आहे, त्यामुळे जिल्ह्यात 1 जानेवारीपासुन कामबंद आंदोलन करण्यात येणार आहे. आमचा दप्तर तपासणी किंवा इतर बाबींना कोणताही विरोध नाही मात्र ज्या पद्धतीने अपमानस्पद वागणूक दिली त्याला विरोध आहे. व्यक्ती नव्हे प्रवृत्तीला विरोध आहे अशी प्रतिक्रिया तहसीलदार जाधव यांनी दिली.
उपविभागीय अधिकारी संजयकुमार डव्हळे यांचेकडून तपासणीवेळी अपमानास्पद वागणूक दिली, एसीबी कारवाईची धमकी देण्यात आली. कार्यालयात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे व कर्मचारी दहशतीमध्ये व मानसिक त्रासामध्ये आहेत. त्यामुळे याचा कार्यालयीन कामकाजावर विपरीत परिणाम होणार आहे असा आरोप अधिकारी व कर्मचारी यांनी केला आहे. डव्हळे यांची बदली अन्य ठिकाणी करण्यात यावी अथवा आमच्या अधिकारी व कर्मचारी यांची बदली अन्य ठिकाणी बदली करावी अशी मागणी जिल्हाधिकारी यांना देण्यात आलेल्या निवेदनात केला आहे.