धाराशिव – समय सारथी
भारतीय रिझर्व्ह बँक अर्थात आरबीआयने समर्थ अर्बन को ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, उस्मानाबाद (बँक) यांच्यावर आर्थिक निर्बंध लादले असुन ठेवीदार यांच्या ठेवी सुरक्षित असल्याने चिंतेचे किंवा घाबरून जाण्याचे काही कारण नाही असे व्यवस्थापक सदानंद स्वामी यांनी कळविले आहे. बँक थकीत कर्ज वसुलीवर भर देत असुन सर्व कायदेशीर मार्ग अवलंबून कडक पावले उचलत आहे. बँकिंग परवाना रद्द केलेला नसुन तात्पुरते काही मर्यादित काळापुरते निर्बंध लादले आहेत.
समर्थ अर्बन को ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, उस्मानाबाद (बँक) विश्वासहर्य होती आणि लवकरच यातून बाहेर येऊन उभारी घेणार आहे. मागील 3 आर्थिक वर्षाच्या अहवालावरून हे निर्बंध घातले गेले आहेत, स्तिथी हळुहळु सुधारत आहे. 1 कोटी रुपयांचे भागभांडवल हे 5 कोटीच्या पुढे गेले असुन एनपीए हा 58 टक्के होता, तो आता 18 टक्क्यावर आला आहे. अकृषी कर्ज जास्त प्रमाणात थकीत असुन त्याच्या वसुलीसाठी विशेष पथक नेमून कायदेशीर प्रक्रिया जलद गतीने राबवली जात आहे असे स्वामी म्हणाले.
बँकेची आर्थिक स्तिथी खराब असल्याने काही निर्देश जारी केले आहेत, बँकची आर्थिक स्थिती सुधारत नाही तोपर्यंत हे निर्देश लागु असणार आहेत. बचत किंवा चालु खात्यातून कोणतीही रक्कम काढण्याची परवानगी नाही. बँकिंग परवाना रद्द केला नसुन निर्बंध लादले आहेत. ऍड व्यंकट गुंड यांची चेअरमनपदी निवड झाल्यावर स्तिथी हळुहळु सुधारत आहे.
6 ऑक्टोबर 2025 रोजीच्या आरबीआय निर्देशात अधिसूचित केल्याशिवाय तिच्या कोणत्याही मालमत्तेची विक्री, हस्तांतरण किंवा अन्यथा विल्हेवाट लावणार नाही असे निर्बंध लादले आहेत. बँकेची सध्याची तरलता स्थिती लक्षात घेता, बँकेला निर्देश देण्यात आले आहेत.निर्देश 7 ऑक्टोबर 2025 रोजी व्यवसाय बंद झाल्यापासून 6 महिन्यांच्या कालावधीसाठी लागू राहतील आणि पुनरावलोकनाच्या अधीन असतील.
आरबीआयच्या लेखी पूर्व मंजूरीशिवाय, कोणतेही कर्ज आणि आगाऊ रक्कम मंजुर किंवा नूतनीकरण करणार नाही. कोणतीही गुंतवणूक करणार नाही, निधी उधार घेणे अथवा कोणतेही दायित्व स्वीकारणार नाही, तिच्या दायित्वे आणि दायित्वे पूर्ण करताना किंवा अन्यथा कोणतेही पेमेंट वितरित करणार नाही किंवा वितरित करण्यास सहमती देणार नाही. कोणत्याही तडजोड करणार नाही.