धाराशिव – समय सारथी
एचआयव्ही बाधित मुलीवर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला असुन या लैंगिक अत्याचारात मुलगी गर्भवती राहिली त्यानंतर तिचा बळजबरीने गर्भपात करण्यात आला. औसा येथील नामांकित संस्थेत हा लैंगिक अत्याचार करण्यात आला असुन अत्याचार करणारे आरोपी, संस्थाचालक, संस्थेतील 2 महिला व डॉक्टर यांच्यावर धाराशिव जिल्ह्यातील ढोकी पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. माणुसकीला काळिमा फासणारी ही घटना घडली आहे.
एचआयव्ही बाधित अल्पवयीन मुलीवर वारंवार बलात्कार करुन तिचा लातूर येथील नामांकित हॉस्पिटलमध्ये गर्भपात करण्यात आल्याचे समोर आले आहे. ही मुलगी ज्या संस्थेत राहत होती त्याच संस्थेतील कर्मचाऱ्याने हाता पायाला बांधून या मुलीवर अत्याचार केला. या मुलीने याबाबत संस्थाचालक यांच्याशी संपर्क केला पण त्यांनी ही घटना तिची मनावर घेतली नाही या मुलीने आत्महत्या देखील करण्याचा प्रयत्न केला त्याकडेही त्यांनी दुर्लक्ष केले.
पीडित मुलगी ही धाराशिव जिल्ह्यातील तिच्या गावी आली असता तिने आजीला हा प्रकार सांगितला, आजीने या मुलीला परत त्या संस्थेत पाठवायचे नाही असे ठरविले. आजी टीसी काढण्यासाठी गेली असता आजीला देखील तिथे दमदाटी करण्यात आली, पुन्हा ही मुलगी त्या एचआयव्ही बाधित संस्थेत परत जात नाही म्हणून धाराशिव कल्याण समितीने विचारणा केली असता या मुलीने सगळा प्रकार त्यांना सांगितला मग त्यांनी ढोकी पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद देऊन पोस्को अंतर्गत गुन्हा नोंद केला.
बलात्कार करणारा आरोपी,संस्थाचालक, महिला अधीक्षक, संस्थेत काम करणारी आणखी एक महिला यांच्यावर पोस्को कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून हा तपास औसा पोलीस स्टेशनकडे वर्ग करण्यात आला आहे. ढोकी पोलीस निरीक्षक विशाल हजारे यांनी यात गांभीर्य ओळखून गुन्हा नोंद केला.