धाराशिव – समय सारथी
पश्चिम बंगालवरून कामासाठी आलेल्या एका अल्पवयीन मुलीवर गुंगीचे औषध देऊन लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला आहे, मुलीचे अश्लील व्हिडिओ काढुन ते व्हायरल करण्याची धमकी देत वारंवार अत्याचार करण्यात आले. हे कांड धाराशिव तालुक्यातील ढोकी येथील राधिका बार व लॉजवर घडले, याप्रकरणी लातुर पोलिसांनी मुरुड पोलिसात गुन्हा नोंद केला आहे. लॉजमालक विश्वजीत लंगडे हा सत्ताधारी भाजप पक्षाच्या युवा संघटनेचा जिल्हा उपाध्यक्ष असुन तो फरार आहे.
पश्चिम बंगाल येथील आलेल्या एका दामपत्याच्या अल्पवयीन मुलीला योगेश राठोड नावाच्या तरुणाने फूस लावुन गुंगीचे औषध देत मुरुड ढोकी रोडवरील राधिका लॉजवर नेहून बलात्कार केला. योगेश याने त्या मुलीसोबत शारीरिक संबंधाचे व्हिडिओ तयार केले, ते व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत वारंवार अत्याचार केले. मुलीने याला विरोध केल्यास ते व्हिडिओ तीच्या वडिलांना पाठवण्यात आले त्यानंतर या कांडाचा उलघडा होत गुन्हा नोंद करण्यात आला, तपास लातुर ग्रामीणचे उपविभागीय पोलिस अधिकारी सुरेशकुमार राऊत हे करीत आहेत.
मुख्य आरोपी व त्याला सहकार्य करणारा फोटोग्राफर मित्र अनिल जाधव याला अटक करण्यात आली आहे. लॉजमालक विश्वजीत लंगडे याच्यासह बार मॅनेजर बाबुराव सगर याला आरोपी करण्यात आले असुन ते दोघे फरार आहेत. कोणी कोणी मुलीवर अत्याचार केला याचा तपास सुरु आहे, या हॉटेलवर असे अनेक प्रकार सुरु असल्याची चर्चा आहे. गुन्हा नोंद होऊ नये यासाठी काही राजकीय पुढाऱ्यानी दबाव आणला मात्र तो फोल ठरला.