तुळजापूर – समय सारथी
तुळजापूर तालुक्यातील एका गावातील तरुणीवर अत्याचार केल्या प्रकरणी आरोपी डॉ रमेश लबडे याला न्यायालयाने 5 दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. गुन्हा नोंद झाल्यापासुन डॉ लबडे हा अडीच महिन्यांपासून फरार होता त्याला अखेर पोलिसांनी पुण्यातून ताब्यात घेत अटक केली. तुळजापूर तालुक्यातील मंगरूळ येथील ओमसाई क्लिनिकचे डॉ. रमेश लबडे यांच्याविरोधात अत्याचाराची फिर्याद 1 नोव्हेंबर 2024 रोजी तुळजापूर पोलिस ठाण्यात दाखल झाली होती. मागील अडीच महिन्यांपासून फरार असलेला डॉ लबडे पुण्यात असल्याची माहिती पोलिसांनी मिळाली होती. पोलिसांनी शनिवारी पुण्यातून त्याला ताब्यात घेतले. रात्रीतून तुळजापुरात आणले. रविवारी डॉ. लबडे यांना न्यायालयात हजर केले असता 17 जानेवारीपर्यंत पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.