धाराशिव – समय सारथी
एका महिलेवर बलात्कार केल्या प्रकरणी धाराशिव येथील कोर्टाने एका आरोपीस 10 वर्षाची शिक्षा तर 17 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. तुळजापूर पोलिस ठाण्या अंतर्गत ही घटना असुन यात आरोपीला शिक्षा सुनावली आहे. जिल्हा सरकारी वकील ऍड महेंद्र देशमुख यांनी केलेला युक्तिवाद व पुरावे आधारे शिक्षा सुनावली.
पिडीतेच्या मैत्रीणीने पिडीतेस कामधंदा पाहण्यासाठी नविन कामाच्या ठिकाणी जायचे असे सांगुन तिस पाटोदा येथे घेवुन गेली व तेथे पिडीतेच्या मैत्रीणीच्या ओळखीचे मुदतशीर शेख यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता त्याचा संपर्क होवु शकला नाही. त्यानंतर संध्याकाळी 7 वाजता संपर्क झाल्यानंतर मुदतशीर शेख व त्याचा मित्र आरोपी सुरज बाबू लातुरे पठाण असे दोघेजण आले. त्या दोघांमध्ये चर्चा व भांडण सुरू होते त्यावेळी पिडीतेने तिचे मैत्रीणीस जाण्यास उशीर होत आहे, गाडी मिळणार नाही म्हणून लवकर निघण्याचा आग्रह केला परंतु पिडीतेच्या मैत्रीणीने ती व्यवस्था करेल असे सांगितले.
रात्री पिडीता ही आरोपी सुरज पठाण याच्या मोटार सायकलवर व तिची मैत्रीण मुदतशीर शेख याच्या मोटार सायकलवर असे तुळजापुर कडे निघाले त्यावेळी आरोपी सुरज याने त्याची गाडी सावकाश चालवल्यामुळे मुदतशीरची गाडी पुढे निघुन गेली. रसत्यामध्ये वडगाव पाटी खडी मशीन येथे आरोपीने पिडीतेस गाडी थांबवुन शरिरसुखाची मागणी केली तेंव्हा पिडीतेने त्यास विरोध केला असता आरोपीने पिडीतेच्या अंगाशी झोंबाझोंबी व मारहाण केली. तेंव्हा आरोपीने पिडीतेस फरफटत घेवुन गेला व पिडीतेस मारहाण करून तिच्याशी जबरदस्तीने शरीरसंबंध केले व तिच्यावर बलात्कार केला.
सदरील घटना कोणास सांगितली तर तिस व तिच्या मुलास खल्लास करण्याची धमकी दिली व तुझी नातेवाईकांमध्ये बदनामी करेन अशी धमकी देत असल्याने त्यास घाबरून पिडीतेबरोबर आरोपीने वेळोवेळी वेगवेगळया ठिकाणी शरीरसंबंध ठेवुन अत्याचार केलेल्या आशयाची तक्रार पोलीस स्टेशन तुळजापुर येथे दाखल केली.
पिडीतेने दिलेल्या तकारीवरून पोलीस स्टेशन तुळजापूर येथे आरोपी सुरज बाबुराव लातुरे पठाण याच्याविरूध्द गुन्हा दाखल झालेवरून एस जी बनसोडे, पोलीस उपनिरीक्षक, तुळजापूर यांनी तपास करून सदर आरोपीविरूध्द मा. न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. सदर खटल्याची सुनावणी अवटे अतिरिक्त सत्र न्यायाधीश धाराशिव यांचे समोर घेण्यात आली.
सरकार पक्षाच्यावतीने एकुण 5 साक्षीदारांच्या साक्ष नोंदविण्यात आले. सरकारी पक्षाचा पुरावा व शासकिय अभियोक्ता महेंद्र बी. देशमुख यांनी केलेला युक्तीवाद ग्राहय धरून आरोपी याने पिडीतेवरती बलात्कार केल्याचे सिध्द झालेवरून आरोपीस न्यायालयाने 10 वर्षाची सक्त मजुरीची शिक्षा व 17 हजार दंड अशी शिक्षा ठोठावली. तसेच सदर प्रकरणाचा तपास पोउपनि एस.जी. बनसोडे, पोलीस उपनिरीक्षक, तुळजापूर पो. स्टेशन यांनी केलेला असुन कोर्ट पैरवी म्हणुन पाटोळे पोहेकॉ यांनी काम पाहिले.










