धाराशिव – समय सारथी
ऑपरेशन सिंदूरचा देशाला अभिमान असुन त्यावर आधारित रांगोळी धाराशिव येथील विसाळ कुटुंबाने गौरी सणात काढून देशप्रेमाचा संदेश दिला. भारताने पाकिस्तानवर कारवाई करून विजय मिळवला, भारताचे पंतप्रधान मोदींनी बदला घेण्यासाठी सिंदूर ऑपरेशन राबविले व आतंकवादी यांचा खात्मा केला. त्याची आठवण म्हणून प्रल्हाद विशाल यांच्या घरात रांगोळी रूपात देखावा सादर केला. यामध्ये सौ सीमा विसाळ आर्या, ईशू व पर्वणी सह शोभा विसाळ यांचे सहकार्य लाभले. ही रांगोळी परिसरातील नागरिकांसाठी आकर्षण ठरत आहे.