धाराशिव – समय सारथी
प्रभु रामचंद्र यांच्या मुर्तीची 22 जानेवारी रोजी प्राणप्रतिष्ठापना होणार असुन त्याची तयारी जवळपास पुर्ण झाली आहे, या सोहळ्यासाठी राज्याचे आरोग्यमंत्री प्रा डॉ तानाजीराव सावंत यांनी आपली सेवा दिली आहे. सोहळा, धार्मिक विधी व होम हवन यासाठी 5 हजार लिटर गीर गाईचे तुप राजस्थान येथून अयोध्या नगरीमध्ये पाठविण्यात आले आहे. नागरिकांनी 22 जानेवारी रोजी जवळच्या मंदिरात जाऊन रामजप व रामरक्षा पठण करीत घरी 5 दिवे लावुन दिवाळी प्रमाणे आनंदोत्सव साजरा करावा असे आवाहन मंत्री सावंत यांनी केले आहे.
भगवान श्रीराम अवघ्या भारतभुमीचे श्रद्धास्थान असुन 500 वर्षाच्या प्रतीक्षेचा अंत होऊन ते आता आपल्या घरात विराजमान होणार आहेत. 22 जानेवारी रोजी हा सोहळा होणार आहे. रामभक्त व कर्तव्य म्हणून एक खारीचा वाटा उचलण्याचे जन्मोजन्मीचे भाग्य यानिमित्ताने मिळाले असे मानत मंत्री सावंत यांनी 5 हजार लिटर तुप राजस्थान येथून पाठवले आहे, ते तिथे पोहचले देखील आहे.
राज्यसह धाराशिव जिल्ह्यातील नागरिकांनी हा सोहळा साजरा करावा असे आवाहन त्यांनी केले आहे.