धाराशिव – समय सारथी
परंडा तालुक्यातील भुमिपुत्र छत्रपती संभाजी महाराज प्रतिष्ठाण संस्थापक अध्यक्ष शिवश्री रामभाऊ पवार यांना अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद 2025 यांच्या वतीने महात्मा फुले पुरस्कार जाहीर करण्यात आला.या पुरस्काराचे पत्र अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ शरद गोरे यांनी दिले आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्या वतीने सन 2025 या वर्षीच्या महात्मा फुले राज्य स्तरीय पुरस्कारासाठी श्री रामभाऊ पवार यांची निवड करण्यात आली.
आपण आजवर केलेल्या सामाजिक शैक्षणिक अरोग्य या क्षेत्रांतील उल्लेखनीय कार्याची दखल घेवून lसदर पुरस्कारासाठी आपली सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. 23 नोहेंबर रोजी सकाळी 11 वाजता सुप्रसिद्ध साहित्यिक कवि माननीय किशोर टिळेकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार आहे. १९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन महात्मा फुले प्रबोधन महात्मा फुले साहित्य संमेलन उद्घाटण सत्रात पुरस्काराचे वितरण होणार आहे.शिवश्री रामभाऊ पवार यांना राज्य स्तरीय पुरस्कार जाहीर झाल्या बद्दल धाराशिव जिल्हा भरात त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे










