धाराशिव – समय सारथी
राज ठाकरे यांनी मराठा आरक्षण बाबत भुमिका स्पष्ट करावी या मागणीसाठी मराठा आंदोलक आक्रमक झाले त्यानंतर त्यांनी राज ठाकरे मुक्कामी थांबलेल्या पुष्पक पार्क या हॉटेलमध्ये तब्ब्ल 3 तास ठिय्या आंदोलन केले. आक्रमक आंदोलनानंतर राज ठाकरे व मराठा आंदोलक यांची आमनेसामने 10 मिनिटे चर्चा झाली.
मी जे बोलतो आहे ते तुम्हाला कळणार नाही, विधानसभा निवडणुक झाल्यावर या गोष्टींचा अंदाज येईल. जरांगे यांची लढाई वेगळी आहे मात्र काही जन तोंडाला पाने पुसत असुन त्यातून राजकीय स्वार्थ साधुन घेत आहेत त्यापासून सावध रहा. महाराष्ट्रात ओबीसी, दलित व इतर कोणालाही आरक्षणाची गरज नाही, ते प्रगत राष्ट्र आहे इथे शिक्षण व रोजगाराच्या संधी आहेत. महाराष्ट्रात हे आहे म्हणुन इथे बाहेरच्या राज्यातील लोक येतात. मोर्चे निघाल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस असताना 16 टक्के आरक्षण दिले गेले मात्र ते फसवे निघाले.जरांगे यांचे आंदोलन सुरु झाल्यावर मी त्यांना भेटलो व सांगितले होते की तुम्ही जी मागणी करताय ती होणार नाही, हे लोक होऊ देणार नाहीत.माथी भडकावून संघर्ष घडविणे व मते मिळविणे हा हेतू आहे.
उद्या जर राज्य माझ्या हातात आले तर कोणालाही आरक्षणाची गरज भासणार नाही. शेतकरी यांच्यावर पैसा खर्च व्हायला हवा मात्र नको त्या गोष्टीवर व लोकांवर पैसे खर्च होत आहेत. पुल बांधले जात आहेत, कोण लोकसंख्या वाढवतोय. 4 मोठ्या शहरात पैसे खर्च होत आहेत.हजारो कोटींची टेंडर काढली जात आहेत कारण शहरातील लोकसंख्या वाढली. शिक्षण, शेतकरी यांच्यावर जो पैसा खर्च व्हायला हवा तो खर्च केला जात नाही. राज्यात अश्या अनेक कंपन्या आहेत जिथे सांगितले जाते मराठी, महाराष्ट्रीयन लोकांना नौकरीला घेतले जाणार नाही. शिक्षण नौकऱ्या कुठे उपलब्ध आहेत हे आपल्या समोर येत नाही, रेल्वेतील नौकर भारती आंदोलनबाबत हेच मी बोललो, महाराष्ट्रात परप्रांतीय नौकरी.नौकरी महाराष्ट्रात व जाहिराती युपी बिहारमध्ये, त्यांना कळते पण तुम्हाला कळत नाही.
मराठा आरक्षण बाबत मनोज जरांगे पाटील यांच्याशी चर्चा करणार असल्याचे ठाकरे यांनी सांगितले. मराठा आरक्षण मिळणे केंद्राच्या हातात असुन त्यासाठी कायदा घटनेत दुरुस्ती करावी लागेल.जरांगे यांना बोलल्यानंतर मराठा आरक्षण बाबत भुमिका स्पष्ट करणार असल्याचे ठाकरे यांनी सांगितले. मराठा आरक्षणाची गोष्ट होणारच नाही आणि ज्या गोष्टी होत नाहीत त्या स्पष्टपणे मी सांगतो. तुमची फक्त माती भडकवण्याचं काम सध्या सुरू आहे. शरद पवारांना हे सगळं माहित आहे मग शरद पवार केंद्राकडे का बोलत नाही. मुख्यमंत्री यांच्याशी आरक्षणावर चर्चा झाली, मग कां सांगत नाहीत. हे तोंडाला पाने पुसणार व घोषणा माझ्या घराबाहेर ? छगन भुजबळ यांनी मराठा समाजावर बोलायचं आणि बाकी मराठ्यांनी ओबीसीवर बोलायचं एवढं सुरू आहे. मी अगोदर जरांगे यांना फोनवर बोलतो त्यानंतर चर्चा करून कळवतो असे ठाकरे यांनी सांगितले.
महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिक माझा आहे, मी जात पात बघत नाही, कळतं नाही व मानतही नाहीत तसे संस्कार आमच्यावर झाले नाहीत. जे लोकसभेला झाले ते विधानसभा निवडणूकीत होईल असे त्यांना वाटत आहे त्यासाठी सगळे प्रयत्न सुरु आहे, माथी भडकवली जात आहेत हाताला काही लागणार नाही. मला काही गैरफायदा घ्यायचा नाही, जे असेल ते मी तोंडावर सांगणार असे आंदोलकांना म्हणाले.