धाराशिव – समय सारथी
धाराशिव शहारापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या पिंपरी या गावात हजारोच्या संख्येने जनावरांचे डोके, पाय व इतर हाडांची साठवणूक करण्यात आली आहे. ही हाडे गोवंशाची असल्याची माहिती असुन धाराशिव ग्रामीण पोलिस निरीक्षक शेळके हे स्वतः घटनास्थळी आले आहेत. पोलिसांनी कारवाईला सुरुवात केली आहे मात्र महसूल व पशुसंवर्धन विभागाकडुन अपेक्षित प्रतिसाद मिळत नाही असा आरोप नागरिकांनी केला आहे. शहरात गोवंशाची कत्तल झाल्यानंतर त्यांचे डोके, पाय व इतर हाडे या ठिकाणी आणुन वाळवली जात असुन यामुळे या भागात दुर्गंधी पसरली असुन नागरिकांचे जगणे मुश्किल झाले आहे. गोवंश बंदी केली असली तरी कत्तल होत असल्याचे अनेक कारवाईतुन समोर आले आहे. पिंपरी येथील अवैध कारखाना उध्वस्त करीत यापुर्वी कारवाई करण्यात आली होती मात्र पुन्हा तिथे तोच प्रकार सुरु आहे. नागरिकांनी याबाबत अनेक वेळा तक्रार, निवेदने देऊनही याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप नागरिकांनी केला. या ठिकाणी असलेली हाडे व इतर अवशेष कुठून आले, हे पाहून दोषीवर कारवाई करावी अशी मागणी होत आहे.