तुळजापूर – समय सारथी
राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी तुळजाभवानी मंदिर परिसराची पाहणी केल्यानंतर तुळजापूर येथे त्यांच्या गाडीसमोर बेताल वक्तव्य करण्यात आले. ठिय्या मांडत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. घोषणाबाजी वेळी आव्हाड समर्थक व आंदोलन करणारे आमने सामने आल्यानंतर धक्काबुक्की करण्यात आली त्यामुळे बराच वेळ तणावाचे वातावरण राहिले त्यानंतर पोलिसांनी हस्तक्षेप केला व गाडीला मार्ग मोकळा करून दिला. आंदोलन दरम्यान आव्हाड गाडीत बसून होते, ते गेल्यानंतर आंदोलकांनी तुळजाभवानी महाद्वार समोर आरती केली व त्यांना सद्बुद्धी दे असे साकडे घातले.
मुंब्रा येथून येऊन आमदार जितेंद्र आव्हाड यांनी बेताल वक्तव्य केले आहे, आई तुळजाभवानी गाभारा उध्वस्त करणार, तुळजाभवानीला हलवणार, तलवार चोरीला गेली आहे. कळस काढणार हे भावना दुखावणारे आहे, हे वक्तव्य कुठल्या आधारे केले. महायुती सरकारच्या माध्यमातून विकास होत असल्याने त्यांचे पोट दुखतं आजन राजकारण करीत आहेत. त्यांच्या वक्तव्याने भावना दुखावल्या आहेत. त्यांनी माफी मागावी अशी मागणी माजी नगराध्यक्ष सचिन रोचकरी यांनी केली.
आव्हाड यांनी अनेक दिवसापासुन मंदीरची बदनामी करण्याचे काम केले आहे, अधिकृत माहिती त्यांनी न घेता मंदीर शिखर पाडण्यात येणार असल्याचे बेताल वक्तव्य करीत तुळजापूरची बदनामी करण्याचा घाट घातला आहे, त्यांनी माफी मागावी. त्यांच्याकडे अधिकृत माहिती व लेखी पुरावा नसताना त्यांनी हे केल्याने निषेध करण्यासाठी गाडीसमोर बसून ठिय्या आंदोलन करीत असल्याचे भाजप अध्यक्ष आंनद कंदले यांनी सांगितले.
आव्हाड आस्तिक आहेत की नास्तिक हे त्यांनी पहिल्यांदा जाहीर करावे, त्यांनी काहीही बोलु नये. मुघल तुळजाभवानी मंदीर उध्वस्त करू शकले नाहीत तर आपण कोण आहोत, त्यामुळे त्यांनी बोलु नये असे विशाल रोचकरी म्हणाले.
जितेंद्र आव्हाड हे प्रसिद्धीचा स्टंट करीत आहेत. प्रभू रामचंद्र विषयी त्यांनी वादग्रस्त वक्तव्य केले होते. सनातन हिंदू धर्माविषयी त्यांनी अनेक चुकीची वक्तव्य केली तो नाही. आजच त्यांना उपरती का आली की मी हिंदू आहे हे सांगण्याची. सर्वांना तुळजाभवानी आपुलकी आहे मात्र त्यांना आजच कळवळा का आला हे त्यांनी सांगावे. राजकीय षडयंत्र व प्रसिद्धीचा स्टंट आहे अशी टीका इंद्रजीत साळुंके यांनी केली.
तुळजाभवानी विषयी चुकीचे वक्तव्य केले आहे, आव्हाड हे नास्तिक आहेत. त्यांना तुळजापूर मध्ये येण्याचा व इथे बोलण्याचा अधिकार नाही. तुळजापूर विकास होत आहे म्हणुन त्यांच्या पोटात आग पडली आहे, त्यामुळे ते विरोध करीत आहेत. त्यामुळे त्यांची मस्ती जिरवावी असे साकडे तुळजाभवानीकडे घालत असल्याचे शांताराम पेंदे म्हणाले.