धाराशिव – समय सारथी
धाराशिव येथील नुतन पोलिस अधीक्षक कार्यालय इमारत व पोलिसांसाठी बनविण्यात आलेल्या 244 सदनिकांचा (फ्लॅट) आज होणारा उदघाटन सोहळा रद्द करण्यात आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री डॉ तानाजीराव सावंत यांच्या हस्ते उदघाट्न होणार होते, त्याची तयारीही करण्यात आली होती मात्र हा सोहळा काही तांत्रिक कारणाने पुढे ढकलला आहे.
नुतन धाराशिव पोलिस अधीक्षक कार्यालय व सदनिका हे धाराशिव जिल्हा पोलिस दलाचे गेल्या अनेक दशकापासूनचे स्वप्न आहे ते प्रत्यक्षात साकारले आहे मात्र त्याच्या उदघाटन सोहळ्याला काही काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे.
पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या पाठपुराव्याने ही इमारत व सदनिका प्रकल्प पुर्णत्वास आला असुन या देखण्या व सर्वसुविधा संपन्न इमारतीमुळे धाराशिव जिल्ह्याच्या वैभवात भर पडणार आहे.
धाराशिव येथील नुतन पोलिस अधीक्षक इमारत ही सज्ज असुन यात पोलिस अधीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालय, शस्त्रागार, आस्थापना, सायबर पोलिस, वाहतुक यासह सर्व शाखांची प्रशस्त कार्यालये असणार आहेत.