ओबीसी सोबत मुस्लिम व दलित आला तर मराठेशाहीचा पॅटर्न हद्दपार करू – बच्चू कडू अन्नात माती कालवत आहेत
धाराशिव – समय सारथी
मराठा आरक्षणासाठी सध्या सर्वेक्षण करताना खोटी माहिती भरली जात आहे, जमिनी गाडी असताना खोटी माहिती ऑनलाईन भरून घेतली जात आहे. श्रीमंत असताना गरीब आहेत, मजुरी करतात अशी माहिती भरली जात आहे यामुळे फसवणूक होत आहे. खोटी माहिती भरणाऱ्या कर्मचारी, शिक्षक यांच्यावर खटले दाखल करू असा इशारा प्रकाश शेंडगे यांनी धाराशिव येथे पत्रकार परिषदेत दिला. यावेळी टी पी मुंडे, बालाजी शिंगे, बप्पा कोरे यासह अर्जुन सलगर, सचिन शेंडगे उपस्थितीत होते.
सर्वेक्षण करणारे शिक्षक व इतर कर्मचारी माहिती खोटी भरत आहेत, आमच्याकडे पुरावे आहेत. या सरकारने कारवाई नाही केली तर 2024 मध्ये ओबीसी सरकार येईल व तेव्हा शोधून शोधून त्याच्यावर गुन्हे नोंद करू, आमची गावोगावी यंत्रणा आहे आम्ही त्यांना सोडणार नाहीत असा इशारा दिला आहे.
देवेंद्र फडणवीस आज का हतबल झाले आहेत ते कळेना, फडणवीस भेटायला तयार नाहीत, आजच्या स्तिथीत सगळे टाळत आहेत, आम्ही जायचं कोणाकडे. मराठा समाजाच्या बाजूने सगळे निर्णय होतात. सरकार ओबीसीशी पंगा घेणार नाही अशी आशा आहे.
मराठा यांच्यावर गरिबीची वेळ ही प्रस्थापित मराठा मुख्यमंत्री,मंत्री, लोकप्रतिनिधी यांनी आणली, ओबीसीमुळे मराठा गरीब झाला नाही,गरीब मराठा यांना आरक्षण मिळावे वेगळा प्रवर्ग करावा असे ते म्हणाले.
ओबीसी आरक्षणाला धक्का लावला तर आम्हाला शेवटी राजकीय आखाड्यात उतरावे लागेल, आमचे आरक्षण वाचवा नाही तर 2024 मध्ये घरचा रस्ता दाखवू. आमचे 60 टक्के मतदान आहे सत्ता स्थापन करू, ओबीसी सोबत मुस्लिम व दलित आला तर मराठेशाहीचा पॅटर्न हद्दपार करू असे शेंडगे म्हणाले. आम्ही सर्व राजकीय आखाडे, डावपेच करू त्यासाठी वंचित मुस्लिम, समविचारी यांना सोबत घेऊ, मैदानात उतरू कारण आम्हाला आरक्षण वाचवायचे आहे असे शेंडगे म्हणाले.
बचू कडू यांनी ओबीसीच्या अन्नात माती कालवू नये अजुन वेळ गेली नाही, त्यांना मतांची गरज नाही असे वाटते, त्यांच्या भूमिकेला विरोध आहे त्यांनी भुमिका बदलावी नाहीतर त्यांना दाखवून देऊ असे शेंडगे म्हणाले. आम्हाला दलित समाज पाठबळ मिळत आहे, प्रकाश आंबेडकर हे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे ते नातू व त्यांच्या विचाराचे वारसदार आहेत, आमचे आरक्षण धोक्यात आले आहे, ते संरक्षण करण्यासाठी आलेत असे ते म्हणाले.