धाराशिव – समय सारथी
धाराशिव पोलीस दलात मोठे फेरबदल करण्यात आले असुन पोलीस अधीक्षक संजय जाधव यांनी ठाणे प्रभारी यांच्या बदल्या केल्या आहेत. परंडा येथील पोलीस निरीक्षक इज्जपवार हे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक असणार आहेत. तुळजापूर येथील पोलीस निरीक्षक रवींद्र खांडेकर यांची धाराशिव आनंद नगर येथे बदली केली आहे तर त्यांच्या जागी तुळजापूर येथे आनंद नगरचे पोलीस निरीक्षक मांजरे यांची नियुक्ती केली आहे. येरमाळा येथील सहायक पोलीस निरीक्षक महेश क्षीरसागर यांची नियंत्रण कक्षात बदली केली असुन त्यांच्या जागी तात्याराव भालेराव हे नियुक्त केले आहेत. लोहारा येथील अजित चिंतले यांची नियंत्रण कक्षात, स्थानिक गुन्हे शाखेचे वासुदेव मोरे यांची परंडा येथे बदली करण्यात आली आहे. सायबर विभागाचे पोलीस निरीक्षक यादव यांची नळदुर्ग येथे तर नळदुर्ग येथील गजेंद्र सरोदे यांची सायबर विभागात बदली केली आहे. ह्या नियमित बदल्या असल्याचे पोलीस विभागाकडून सांगण्यात येत आहे.