धाराशिव – समय सारथी
हिट अँड रन कायद्याच्या विरोधात देशभरात ट्रक, टँकर चालकांनी संप पुकारला त्यामुळे इंधन वाहतूक करणारे वाहन चालक सुद्धा या संपात सहभागी झाले, त्यांनी 3 दिवस संपाची घोषणा केली. इंधन वाहतूक बंद झाल्याने देशभरात एकच गोंधळ उडाला, पेट्रोल डिझेल तुटवडा भासेल असा अंदाज बांधत अनेक जण दुचाकी चारचाकी घेऊन टाकी फुल्ल करण्यासाठी पंपावर आले. काहींनी टाकी तर फुल्ल केलीच शिवाय प्लास्टिक बाटली, कॅन मिळेल त्यात साठा केला.
धाराशिव शहरातील माणिक चौक या भागातील खामकर यांच्या पंपावर एक पठ्या इंधन साठा करण्यासाठी घागर घेऊन आला. पाणी साठा करण्यासाठी वापरली जाणारी घागर मोकळी करुन त्याने इंधन साठा केला. एका हातात पैसे तर दुसऱ्या हातात घागर असा पंपावरील व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. कोण कधी कोणती शक्कल लावेल त्याचा अंदाज कदापी करता येणार नाही.