Samay Sarathi
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
    • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
    • इतर
    • परांडा
    • धाराशिव
    • पुणे
  • जाहिरात
No Result
View All Result
  • ई-पेपर
  • वेब स्टोरीज
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
    • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
    • इतर
    • परांडा
    • धाराशिव
    • पुणे
  • जाहिरात
No Result
View All Result
Samay Sarathi
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
  • जाहिरात

अहवाल सादर, 565 शेतकरी दोषी – शासकीय जमिनीवर बोगस पीक विमा घोटाळा, गुन्हा नोंद करा -आमदार सुरेश धस

समय सारथी by समय सारथी
January 21, 2025
in महाराष्ट्र
0
0
SHARES
975
VIEWS

धाराशिव – समय सारथी

धाराशिव जिल्ह्यातील कोट्यावधी रुपयांच्या बोगस पीक विमा घोटाळा प्रकरणात वीमा भरलेले 565 शेतकरी दोषी असल्याचा अहवाल जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांनी पोलीस अधीक्षक संजय जाधव यांना पाठविला आहे. बोगस पीक विमा प्रकरणी ऑनलाईन केंद्र चालकांवर गुन्हा नोंद करण्यात आला होता मात्र या घोटाळ्यात विमा भरणाऱ्या शेतकऱ्यांना आरोपी न करता अभय देण्यात आल्याचा आरोप आमदार सुरेश धस यांनी केला आहे. शेतकरी यांना सुद्धा आरोपी करावे अशी त्यांची मागणी असुन जिल्हाधिकारी यांच्या समितीने शेतकरी दोषी असल्याचा अहवाल दिल्याने शेतकऱ्यांना सहआरोपी करणार की स्वतंत्र गुन्हा नोंद होणार हे पाहावे लागेल. भाजप आमदार सुरेश धस यांनी विधीमंडळात आवाज उठवला आहे तर धाराशिव येथील जनआक्रोश मोर्चात राज्यात बोगस पीक विमा भरला जात असल्याचा आरोप केला होता. राज्यातील बोगस पीक विमा घोटाळ्याचा केंद्रबिंदु हे परळी येथे आहे.

दोषी सापडलेले शेतकरी हे अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, बीड, अकोला, कर्नाटक राज्यातील बिदर, लातुर, नांदेड, नाशिक, धाराशिव, परभणी, पुणे, रायगड, सातारा, सोलापूर या 14 जिल्ह्यातील आहेत. या शेतकऱ्यांनी धाराशिव जिल्ह्यातील भुम, कळंब, तुळजापूर, लोहारा, धाराशिव, वाशी तालुक्यातील शासकीय जमिनीवर ऑनलाईन अर्ज करीत विमा भरला होता. 565 पैकी तब्बल 454 शेतकरी हे एकट्या बीड जिल्ह्यातील असुन 37 शेतकरी लातुर, 14 धाराशिव जिल्ह्यातील आहेत. शेतकऱ्यांनी गायरान, संपादित तलाव, वन विभागाची जमीन ते चक्क कॅनल, सडक, महाराष्ट्र शासन मालकीच्या जमिनीवर विमा भरला होता. 

धाराशिव जिल्ह्यातील शासकीय 2 हजार 994 हेक्टर शेत जमीन स्वतःची आहे असे दाखवुन 565 शेतकऱ्यांनी 1 हजार 170 अर्जाद्वारे ऑनलाईन पीक विमा काढला होता, त्यापोटी सरकारने 3 कोटी 13 लाख रुपयांचा वाटा हिस्सा म्हणून पीक विमा हप्ता भरला.15 कोटी 68 लाख रुपयांचा पीक विमा मिळावा यासाठी या सगळ्यांनी कट रचून फसवणूक केल्याप्रकरणी जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांनी चौकशीचे आदेश दिले होते. जिल्हा कृषी अधीक्षक रवींद्र माने व त्यांच्या टीमने या प्रकरणाची व प्रत्येक अर्जाची चौकशी केली त्यानंतर कृषी उप संचालक बाबासाहेब वीर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून 7 एप्रिल 2024 रोजी 24 जणांवर आनंद नगर पोलीस ठाण्यात कलम 420 नुसार गुन्हा नोंद झाला त्यातील 24 पैकी 16 आरोपी परळी तालुका व हेळंब गाव बीड जिल्ह्यातील आहेत. 24 पैकी 19 आरोपीना अटक करण्यात आले असुन 15 जणांना अटक करुन नियमित तर 4 जणांना अटकपुर्व जामीन झाला आहे.

खरीप हंगाम 2023 मध्ये शासकीय जमिनीवर पिक विमा भरलेल्या 24 ऑनलाईन केंद्र चालकावर गुन्हा दाखल करण्यात आलेला असून त्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक करीत आहेत. त्यांनी जिल्हाधिकारी यांना पत्र लिहीत विमा भरलेले शेतकरी दोषी आहेत का? याबाबत मार्गदर्शन मागवले होते त्यानुसार जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांनी ते 565 शेतकरी दोषी असल्याचे कळविले आहे त्यामुळे त्यांच्यावर आता कारवाई केली जाणार आहे. 565 शेतकऱ्यांनी 1170 अर्जाद्वारे शासकीय जमिनीवर ऑनलाईन पिक विमा भरलेला होता अशा शेतकऱ्यांची पडताळणी करणेच्या अनुषंगाने 31 डिसेंबर 2024 रोजी जिल्हास्तरीय संयुक्त समितीची आढावा बैठक घेण्यात आली. शासकीय जमिनीवर विमा भरलेल्या शेतकऱ्यांची कृषि सहायक व विमा प्रतिनिधी यांच्याकडुन पडताळणी करण्यात आली. शासकीय जमिनीवर स्वतः पीक विमा भरलेला असल्याने सदरील 565 शेतकरी दोषी दिसुन येत आहेत असे पत्र पोलीस अधीक्षक यांना जिल्हाधिकारी यांनी दिले आहे.

Previous Post

नियमित दररोज सुनावणी होणार – पवनराजे दुहेरी हत्याकांड अंतीम टप्प्यात, माजी गृहमंत्री डॉ पद्मसिंह पाटील मुख्य आरोपी

Next Post

प्राणघातक हल्ला – काय चाललंय मित्रा म्हणल्याने सत्तूरने मित्रावर केला वार

Related Posts

महाराष्ट्र

धाराशिव, बीड ते छत्रपती संभाजीनगर रेल्वे मार्ग – विकासाची नवी दिशा, आढावा बैठक संपन्न

March 28, 2026
महाराष्ट्र

पत्नीचा खून, पतीस जन्मठेपेची शिक्षा – चारित्र्यावर संशय, चाकुने वार – धाराशिव कोर्टाचा निकाल 

March 27, 2026
महाराष्ट्र

उच्च न्यायालयाचे आदेश – पार्वती मल्टीस्टेट बँकेचे पैसे खातेदारांना द्या, 2 महिन्यात प्रक्रिया पुर्ण करा 

March 26, 2026
महाराष्ट्र

राकेश मारिया ते ऋषीराज सिंग – कै पवनराजे हत्याकांडातील तपास, एक वादग्रस्त तर दुसरा दबंग – ‘या’ 4 नेत्यांचा दबाव

March 24, 2026
महाराष्ट्र

हाजीर हो… युक्तिवाद संपला आता निकालाकडे लक्ष – कै पवनराजे निंबाळकर दुहेरी हत्याकांड, 16 महिने प्लॅन, 3 गोळ्या झाडल्या

March 22, 2026
महाराष्ट्र

नार्को चाचणी – कै पवनराजे दुहेरी हत्याकांड, पारसमल जैन केंद्रस्थानी, कबुली जबाब – छोटा राजन टोळीवर आरोप

March 22, 2026
Next Post

प्राणघातक हल्ला - काय चाललंय मित्रा म्हणल्याने सत्तूरने मित्रावर केला वार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

सर्वाधिक पसंतीचे

  • आदेश – गुन्हा नोंद करण्याचे जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांचे तहसीलदारांना आदेश 

    आदेश – गुन्हा नोंद करण्याचे जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांचे तहसीलदारांना आदेश 

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दरोडेखोरांच्या गँगचा धाराशिवमध्ये धुमाकुळ – 8 ते 10 सशस्त्र लोक CCTV मध्ये कैद, पोलिस दाखल… पहा व्हिडिओ 

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking – तुळजापूर ड्रग्ज तस्करीत अखेर मास्टर माईंडला केले आरोपी – गंगणे, कणेसह 12 आरोपी वॉन्टेड

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दरोडेखोरांचा पुन्हा धुमाकुळ, 5 जणांची सशस्त्र टोळी CCTv मध्ये कैद, सोने चोरून थुकून गेले – धाराशिव पोलिसांना आव्हान

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • वीज पडुन एक तरुण ठार, धाराशिव जिल्ह्यातील घटना

    0 shares
    Share 0 Tweet 0

ताज्या बातम्या

धाराशिव, बीड ते छत्रपती संभाजीनगर रेल्वे मार्ग – विकासाची नवी दिशा, आढावा बैठक संपन्न

March 28, 2026

पत्नीचा खून, पतीस जन्मठेपेची शिक्षा – चारित्र्यावर संशय, चाकुने वार – धाराशिव कोर्टाचा निकाल 

March 27, 2026

उच्च न्यायालयाचे आदेश – पार्वती मल्टीस्टेट बँकेचे पैसे खातेदारांना द्या, 2 महिन्यात प्रक्रिया पुर्ण करा 

March 26, 2026
March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    
  • ई-पेपरNew
  • वेब स्टोरीजNew
  • आमच्या विषयी
  • संपर्क
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
  • जाहिरात

© 2023 .

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
    • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
    • इतर
    • परांडा
    • धाराशिव
    • पुणे
  • जाहिरात

© 2023 .

error: Content is protected !!
Manage Cookie Consent
To provide the best experiences, we use technologies like cookies to store and/or access device information. Consenting to these technologies will allow us to process data such as browsing behavior or unique IDs on this site. Not consenting or withdrawing consent, may adversely affect certain features and functions.
Functional Always active
The technical storage or access is strictly necessary for the legitimate purpose of enabling the use of a specific service explicitly requested by the subscriber or user, or for the sole purpose of carrying out the transmission of a communication over an electronic communications network.
Preferences
The technical storage or access is necessary for the legitimate purpose of storing preferences that are not requested by the subscriber or user.
Statistics
The technical storage or access that is used exclusively for statistical purposes. The technical storage or access that is used exclusively for anonymous statistical purposes. Without a subpoena, voluntary compliance on the part of your Internet Service Provider, or additional records from a third party, information stored or retrieved for this purpose alone cannot usually be used to identify you.
Marketing
The technical storage or access is required to create user profiles to send advertising, or to track the user on a website or across several websites for similar marketing purposes.
Manage options Manage services Manage {vendor_count} vendors Read more about these purposes
View preferences
{title} {title} {title}

WhatsApp us

Join On WhatsApp