धाराशिव – समय सारथी
बार्शी येथे ड्रग्ज तस्करीत सोलापूर पोलिसांनी परंडा येथील वसिम इसाक बेग व जावेद नवाबमुद्दीन मुजावर या 2 आरोपीसह बार्शी येथील जमीर अन्सार पटेल अश्या 3 जणांना अटक केली असुन कोर्टाने 22 एप्रिल पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. पोलिसांनी आतापर्यंत 6 आरोपीना अटक केली असुन त्यातील 4 जन हे परंडा येथील आहेत. आरोपी वसीम बेग व इतर आरोपीचे खरेदी विक्री बाबत व्हाट्स ऍप चॅट पोलिस तपासात सापडले असुन आरोपी सरफराज शेख याने असद देहलुज,वसीम बेग व जावेद मुजावरकडुन ड्रग्ज घेतल्याचे कबुल केले आहे. वसीम बेग हा पाहिजे तितक्या पुड्या घ्या, आता मिळेल नंतर नाही असे सांगत होता असे स्पष्ट झाले असुन या तस्करांनी कोणा कोणाला ड्रग्ज विकले याचा तपास पोलिस करीत आहेत त्यामुळे याची साखळी आगामी काळात उघड होणार आहे.
आरोपींचा स्थानिक व परराज्य पुरवठादारांशी संबंध असल्याचा संशय पोलिसांना असुन गुन्ह्यांची व्याप्ती गंभीर असून आर्थिक लाभासाठी अमली पदार्थ व शस्त्र व्यवहार सुरु असल्याची प्राथमिक माहिती आहे. पोलिसांनी या मुद्याच्या आधारे पोलिस कोठडी मागितली आणि ती कोर्टाने दिली आहे. पोलिस उपनिरीक्षक अभय माकणे यांनी कोर्टात रिमांड सादर केले.
बार्शी येथील ड्रग्ज तस्करीतील 3 आरोपीना कोर्टाने पोलिस कोठडी सुनावली आहे, आरोपी असद हसन देहलुज (वय 37, रा. पल्ला गल्ली, परांडा), मेहफुज महंमद शेख (वय 19, रा. बावची, परांडा) आण सिरफराज उर्फ गोल्डी अस्लम शेख (वय 32 रा.काझी गल्ली, बार्शी) यांना 20 ग्रॅम वजनाचे 10 पुड्यासह पोलिसांनी 18 एप्रिल रोजी अटक केली होती. असद देहलूजकडे 9.19 ग्रॅम ड्रग्ज 5 पुड्या व पिस्टल, मेहफुज शेख कडे 5.73 ग्रॅम ड्रग्ज 2 पुड्या व सरफराज उर्फ गोल्डी कडे 5.12 ग्रॅम 3 पुड्या असे 20 ग्रॅम ड्रग्ज जप्त केले.
ड्रग्ज कुठून आणले होते व कोणाला दिले जाणार होते, पुरवठादार कोण? गावठी पिस्टल कोणाकडुन आणले त्याचा वापर इतर गुन्ह्यात झाला का? आरोपीचे मोबाईल, कॉल डिटेल, सोशल मीडिया यासह अन्य बाबी तपास, अमली पदार्थ व शस्त्र विक्रीचा व्यवहार, इतर साथीदार याचा तपास करण्यासाठी पोलिसांनी कोठडी मागितली त्यानुसार ती देण्यात आली. पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी जालिंदर नाकुल व पोलीस निरीक्षक बालाजी कुकडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक उमाकांत कुंजीर व त्यांच्या पथकाने ही कारवाई केली.