धाराशिव – समय सारथी
ज्योती क्रांती मल्टीस्टेट बँकेवरील दरोड्याचा मास्टर माईंड धाराशिव शहरातील विजय चौक येथील रमेश बळीराम दीक्षित यासह 3 जणांना कोर्टाने आज 12 जानेवारी पर्यंत 4 दिवसांची वाढीव पोलिस कोठडी दिली आहे. तपासात पोलिसांना काही मुद्देमाल मिळाला असुन इतर आरोपीचे ठिकाणे सापडले असल्याने कोर्टाने वाढीव पोलिस कोठडी दिली आहे. दरोड्यातील 4 किलो सोन्यापैकी 1 किलो सोने हस्तगत केले आहे.
दीक्षित याने दरोड्याचा कट रचित सगळी तयारी केली व ज्या दिवशी दरोडा टाकला गेला त्यादिवशी तो संशय येऊ नये म्हणून गावातून बाहेर निघुन गेला. यातील सगळे आरोपी हे कर्जबाजारी झाले होते त्यातून मुक्तता व्हावी यासाठी त्यांनी दरोडा टाकला मात्र त्यांच्या हातात बेड्या पडल्या. दरोड्याच्या पैशातुन त्यांनी काही कर्ज, घरभाडे, बिले भरली अशी माहिती समोर आली आहे.
दीक्षित यांच्याकडून 1 किलो सोने जप्त केले असुन त्याची किंमत 50 लाख आहे. कर्जातून मुक्त होण्यासाठी व झटपट श्रीमंत होण्यासाठी दीक्षित याने हा मार्ग स्वीकारत दरोड्याची योजना आखली आणि गेली 6 महिन्यापासून प्लॅन करीत अनेकवेळा रेकी केली. दीक्षित हा सोनार असुन त्याचे सोन्याचे दुकान आहे, तो 3 वर्षांपूर्वी ज्योती क्रांती बँकेत कामाला होता मात्र त्याने नंतर ते काम सोडले. पोलिसांनी 10 दिवसात गुन्ह्याची उकल करीत आतरराज्य टोळीचा पर्दाफाश केला.धाराशिव येथील कोर्टाने तिन्ही आरोपीना 8 जानेवारीपर्यंत 6 दिवसांची पोलिस कोठडी सुनावली होती टी संपल्यावर आज पुन्हा कोर्टात हजर केले तेव्हा वाढीव पोलिस कोठडी देण्यात आल
पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व विशेष पथकाने ही कारवाई केली. दरोड्याचा उलघडा झाल्याने नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. सदरची कामगीरी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी व अपर पोलीस अधीक्षक गौहर हसन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक वासुदेव मोरे , स्थागुशाचे सपोनि सुदर्शन कासार, गोरक्ष खरड,शैलेश पवार,पोलीस उप निरीक्षक संदीप ओहोळ,पोहेकॉ अश्विन जाधव,दिलीप जगदाळे,अमोल निंबाळकर, प्रकाश औताडे,जावेद काझी,वल्ली उल्ला काझी , हुसेन सय्यद,शौकत पठाण,पाडुरंग सावंत,विनोद जानराव,समाधान वाघमारे,अशोक ढगारे,नितीन जाधवर, बबन जाधवर,चालक घुगे,चौरे,भोसले,गुरव,आरब,मपोहेकॉ शैला टेळे,शोभा बांगर तसेच सायबर सेलचे पोलीस अंमलदार अशोक कदम, सुनिल मोरे यांच्या पथकाने केली आहे.
दरोडा टाकण्यासाठी मुंबई, राजस्थान येथील आरोपी या कटात सहभागी असुन सोने हे काही सराफ व्यापारी यांना विकले आहे. आरोपीनी दरोडा टाकण्यापुर्वी व नंतर काही काळ तुळजापूर येथे मुक्काम केला.आरोपीनी गुन्ह्याची कबुली दिली असुन या दरोड्यात लुटलेले तब्बल 4 किलो सोने त्यांनी काही सरफा व्यापारी यांना विकले असुन ते हस्तगत करण्यासाठी पोलिसांचा अधिक तपास सुरु आहे.
धाराशिव शहरातील मुख्य भागातील सुनील प्लाझा येथील ज्योती क्रांती बँक लुटून आरोपीनी तब्बल 4 किलो 120 ग्राम सोन्यासह 1 लाख 40 हजार रुपये दोन मोबाईल सहा हजार रुपये असा 1 कोटी 87 लाख 14 हजार रुपयाचा मुद्देमाल लुटून नेला होता. 5 दरोडेखोरांनी हा दरोडा टाकला असुन त्यापैकी 3 जणांच्या हातात पिस्टल होते, विशेष म्हणजे त्यांनी चेहरा न झाकता दरोडा टाकला असुन ते सर्वजण 5 सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाले होते त्यातील 3 जणांना अटक केली आहे.