धाराशिव – समय सारथी
धाराशिव येथील तरुण तडफदार पत्रकार तथा today समाचार या चॅनलचे संपादक हुकमत मुलाणी याचे आज सकाळी हृदय विकाराच्या तीव्र धक्याने दुःखद निधन झाले. विविध वृत्तपत्रात काम करून त्यांनी नाव कमावले होते, वेगवेगळे विषय हाताळून त्यांनी पत्रकारिता क्षेत्रात आपले स्थान निर्माण केले होते. त्यांच्या आत्म्यास शांती मिळो, भावपूर्ण श्रद्धांजली.
पत्रकार दिलीप पाठक नारीकर यांचे काल निधन झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी मुलाणी यांचे निधन पत्रकार क्षेत्राला सलग धक्कादायक आहे.