धाराशिव – समय सारथी
महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी शरद पवार गटाने त्यांची 22 नावांची दुसरी यादी जाहीर केली असुन त्यात धाराशिव जिल्ह्यातील भुम परंडा मतदार संघात राहुल मोटे यांच्या नावाची उमेदवार म्हणुन घोषणा करण्यात आली आहे, राहुल मोटे यांनी काल त्यांचा उमेदवारी अर्ज एबी फॉर्मसह भरला आहे. महाविकास आघाडीतील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने सुद्धा भुम परंडा मतदार संघातुन माजी आमदार कै ज्ञानेश्वर पाटील यांचे पुत्र रणजीत पाटील यांना उमेदवारी जाहीर केली असुन खुद्द उद्धव ठाकरे यांनी रणजीत यांना पक्षाचा एबी फॉर्म दिला आहे.
महाविकास आघाडीतील शिवसेना व राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांनी उमेदवार जाहीर करुन एबी फॉर्म दिल्याने या जागेबाबतचा पेच वाढला आहे. पाटील व मोटे हे दोघेही ठाम असुन गाठीभेटी प्रचाराला सुरुवातीला केली आहे.त्यामुळे आता माघार कोण घेणार हे पाहावे लागेल. ठाकरे यांच्याकडून परंडा जागा राष्ट्रवादीला घेल्याचा दावा राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केला आहे, ठाकरे यांच्याशी चर्चा करुन निर्णय घेऊ असे जयंत पाटील म्हणाले आहेत. दरम्यान सोमवारी रणजीत पाटील हे शिवसेनाकडुन उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत, त्यांनी अंतरवली येथे जात मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांची भेट घेत आशीर्वाद घेतले आहेत. राष्ट्रवादीने पहिल्या यादीत 45 जणांची यादी तर दुसरी 22 उमेदवार यांची जाहीर केले आहेत, 67 जणांची नावे जाहीर केली आहे.
राहुल मोटे हे 2004, 2009, 2014 असे सलग 3 टर्म आमदार होते तर त्यांचे वडील महारुद्र बप्पा मोटे हे 1985 व 1990 असे 2 टर्म आमदार होते त्यानंतर 1995 व 1999 असे 2 टर्म ज्ञानेश्वर पाटील हे 10 वर्ष आमदार होते त्यांचे 3 ऑक्टोबर रोजी निधन झाले होते त्यांचे पुत्र रणजीत यांना शिवसेना उबाठा गटाने उमेदवारी दिली आहे. मोटे यांच्या घरात 25 वर्ष आमदारकी राहिली मात्र त्याला प्रा डॉ तानाजीराव सावंत यांनी सुरुंग लावला व मोटे यांचा पराभव करुन विक्रमी विजय मिळवला.
2019 च्या विधानसभा निवडणुकीत परंडा मतदार संघात पालकमंत्री तथा आरोग्यमंत्री डॉ तानाजीराव सावंत हे विक्रमी 32 हजार 902 मतांनी विजयी झाले होते त्यांनी सलग 3 टर्म आमदार राहिलेल्या राष्ट्रवादीचे राहुल मोटे यांचा पराभव केला होता. मोटे यांना 73 हजार 772 मते पडली होती तर सावंत यांना 1 लाख 6 हजार 674 मते पडली होती.