धाराशिव – समय सारथी
धाराशिव जिल्ह्यातील पुरग्रस्त शेतकरी यांच्यासोबत सहकुटुंब दिवाळी साजरी करण्याचा निर्णय पालकमंत्री प्रतापराव सरनाईक यांनी घेतला आहे. 14 व 15 ऑक्टोबर रोजी पालकमंत्री सहकुटुंब येणार असुन ते शेतकऱ्यांच्या घरी जाऊन त्यांच्यासोबत दिवाळी साजरी करणार आहेत. शेतकऱ्यांना दिवाळीचा फराळ, शैक्षणिक साहित्य व इतर साहित्य ते देणार आहेत.
पुरामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असुन आर्थिक संकटात आहे. त्यांना आधार मिळावा यासाठी सरकारच्या माध्यमातून प्रयत्न सुरु असुन वयक्तिक मदत सुद्धा पालकमंत्री करीत आहेत.