धाराशिव – समय सारथी
महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री तथा धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री प्रतापराव सरनाईक हे 19 व 20 जुलै अश्या दोन दिवसांच्या धाराशिव जिल्हा दौऱ्यावर येत असून या दौऱ्यात हरीत धाराशिवसह विविध विकासकामांचे भूमिपूजन, आढावा बैठक अशा महत्त्वाच्या कार्यक्रमांमध्ये ते सहभागी होणार आहेत.
शनिवार, 19 जुलै रोजीचा दौरा:
पालकमंत्री सकाळी 10 वाजता खाजगी विमानाने मुंबईहून सोलापूरकडे प्रयाण करतील. सोलापूर विमानतळावर सकाळी 11.15 वाजता आगमन झाल्यानंतर ते शासकीय वाहनाने धाराशिवकडे रवाना होतील. दुपारी 12.15 वाजता शिंगोली (ता. धाराशिव) येथील राखीव वनामध्ये आयोजित ‘हरित धाराशिव’ अभियानाच्या उद्घाटन समारंभास ते उपस्थित राहतील. त्यानंतर ते दुपारी 2.15 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, धाराशिव येथे पोहोचून काही वेळ राखीव कार्यक्रमासाठी थांबतील. सायंकाळी 4.45 वाजता उमरगा बसस्थानक नुतनीकरण कामाचे भूमिपूजन करण्यात येणार आहे. त्यानंतर 5 वाजता गुंजोटी (ता. उमरगा) येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेला (ITI) भेट देतील. 5.35 वाजता मुरूम बसस्थानक नुतनीकरणाचे भूमिपूजन होईल. त्यानंतर 6.15 वाजता मुरूम येथील महात्मा बसवेश्वर नागरी सहकारी पतसंस्थेला सदिच्छा भेट देऊन शासकीय विश्रामगृह, सोलापूर येथे मुक्काम करतील.
रविवार, 20 जुलैचा दौरा:
सकाळी 7 वाजता सोलापूरहून तुळजापूरकडे प्रयाण होईल. 7.50 वाजता श्री तुळजाभवानी मंदिर येथे आगमन होऊन तेथे अभिषेक पूजा पार पडेल. त्यानंतर 9.45 वाजता पोलीस विभागाच्या अधिकाऱ्यांशी आढावा बैठक घेण्यात येईल. 10.45 वाजता नळदुर्ग (ता. तुळजापूर) येथे प्रस्थान होऊन 11.30 वाजता नळदुर्ग किल्ला पाहणी केली जाईल. त्यानंतर 12.30 वाजता जेवळी (ता. लोहारा) येथे होणाऱ्या वृक्षारोपण सोहळ्यात मंत्री सहभागी होतील. कार्यक्रमानंतर दुपारी 1.30 वाजता ते सोलापूर शासकीय विश्रामगृहात परत येतील व 3.30 वाजता मुंबईकडे प्रयान करतील.