धाराशिव – समय सारथी
पाडोळी पंचायत समिती गणातील भाजप उमेदवार सुरज इंगळे यांना मोठा दिलासा मिळाला असुन त्यांच्या विरोधात दाखल केलेला आक्षेप अर्ज निवडणुक निर्णय अधिकारी यांनी फेटाळला आहे. ॲड एम बी माढेकर यांनी केलेला युक्तिवाद व सादर केलेली कागदपत्रे, इतर निर्णयाचे दाखले पाहून हा आक्षेप फेटाळला. याकामी अँड अमर इंगळे, ॲड धर्मराज सरडे, अँड विशाल बारकुल यांनी सहकार्य केले.
मेंढा येथील मनोज वाघमारे यांनी कनगरा येथील सुरज दादाराव इंगळे यांच्या पंचायत समिती पाडोळी गण मधील उमेदवारी अर्जावर आक्षेप घेतला होता. या प्रकरणात अर्जदार व गैरअर्जदार यांच्या उपस्थितीतीत 23 जानेवारी रोजी उपविभागीय अधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कोर्टात सुनावणी घेण्यात आली.
सुरज दादाराव इंगळे यांनी सर्वसाधारण जागेकरीता भारतीय जनता पार्टी या पक्षातुन नामनिर्देशनपत्र सादर केलेले होते. सदर नामनिर्देशनपत्रामध्ये सुचक म्हणुन अमर काशिनाथ इंगळे यांचा मतदार यादीतील तपशील 223/243 असा आहे व त्यांनी सदर नाम निर्देशनपत्रावर सुचक म्हणुन सही केलेली आहे. तसेच नामनिर्देशनपत्र अनुक्रमांक 323 वर सुरज दादाराव इंगळे यांनी सर्वसाधारण अपक्ष नामनिर्देशनपत्र सादर केले त्यावर सुद्धा सुचक म्हणुन अमर काशिनाथ इंगळे यांनीच सही केलेली आहे असा आक्षेप घेतला.
आक्षेप अर्जदार यांना सदरचा आक्षेप सादर करणेचा कसल्याही प्रकारचा कायदेशीर अधिकार नाही. जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक 2026 नामनिर्देशन पत्र भरणेसाठी सर्व साधारण सुचनांचे अवलोकन केले असता सदर सुचना हया सर्वसाधारण सुचना असुन त्या कायदेशीर नियम नाहीत सदर सुचनांच्या अनुषंगाने निवडणूक निर्णय अधिकारी यांनी मुळात उमेदवाराचा म्हणजेच सुरज दादाराव इंगळ े यांचा एक नामनिर्देशन पत्र नमुद तांत्रिक कारणास्तव अवैध ठरवले आहे त्यामुळे दुसरा राष्ट्रीय पक्षाचा उमेदवारी अर्ज कायदेशीररित्या वैध झालेला आहे.











