धाराशिव – समय सारथी
उस्मानाबाद जिल्ह्याचे धाराशिव नामांतरण केल्याच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली असुन त्यावर 25 जानेवारी रोजी सुनावणी होणार आहे. धाराशिव येथील मसुद शेख व इतर 16 जणांनी ऍड सतीश तळेकर मार्फत याचिका दाखल केली आहे. मुख्य न्यायाधीश देवेंद्र कुमार उपाध्ये व न्यायाधीश डॉ आरेफ यांच्या द्विसदस्य पिठासमोर सुनावणी होणार आहे.
धाराशिव उस्मानाबाद नामांतरण विरोधात मसुद ईस्माईल शेख,कादरखान, नगरसेवक खलिफा कुरेशी,आयाज हारून शेख,जफर अली मोमिन,असद खान पठाण, ईस्माईल बाबा शेख, वाजिद पठाण निजामोद्दीन बाबा मुजावर, बिलाल तांबोळी, मन्नान काझी आतिक शेख, समियोद्दीन मशायख, अफरोज पिरजादे, ईम्तियाज बागवान व ईलियास पिरजादे यांच्या वतीने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली.
मंत्रीमंडळाच्या बैठकीत शिंदे भाजप सरकारने 16 जुलै 2022 रोजी उस्मानाबादचे धाराशिव नामातरण करण्याचा निर्णय घेतला यापूर्वी ठाकरे महाविकास आघाडी सरकारने नामांतरण निर्णय घेतला मात्र सरकार अल्पमतात असताना हा निर्णय घेतल्याने कायदेशीर पेचप्रसंग नको म्हणून तो पुन्हा घेण्यात आला.काँग्रेस राष्ट्रवादी व शिवसेना या महाविकास आघाडी सरकारने 29 जुन रोजी मंत्रिमंडळ बैठकीत नामकरण निर्णय घेतला, या निर्णयाला काँग्रेस राष्ट्रवादीने सहमती दिली होती.