धाराशिव – समय सारथी
महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी देवीचे पुरातन व मौल्यवान सोने-चांदीचे अलंकार चोरणाऱ्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉक्टर सचिन ओम्बासे यांनी तहसीलदार यांना दिले आहेत. महंत, सेवेकरी व प्रशासकीय अधिकारी यात दोषी सापडले आहेत. चांदीचा मुकुट, त्रिशूल, प्रभावळ, धुपारती यासह अनेक चांदीच्या व सोन्याच्या वस्तू गायब आहेत.
गेल्या अनेक वर्षापासून तुळजाभवानी मंदिरातील देवीच्या पुरातन दागिन्याची मोजतात झाली नव्हती, ती मोजतात जिल्हाधिकारी यांनी करण्याचे आदेश दिले व त्यानंतर त्या मोजदादीमध्ये अनेक मौल्यवान अलंकार सोने-चांदीच्या वस्तू गहाळ असल्याचं समोर आले आहे. या गहाळ वस्तूची जबाबदारी निश्चित करून त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉक्टर सचिन ओंबासे यांनी दिले आहेत.
अलंकाराची मोजदाद झाल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी फौजदारी कार्यवाही करण्यासाठी कायदेशीर समिती नेमली होती त्या समितीने दिलेला अहवालात तुळजाभवानी देवीचे अनेक पुरातन अलंकार सोन्या-चांदीचे दागिने हे गहाळ झाल्याचं समोर आलं आहे.
त्यात हे दागिने व अलंकार ज्यांच्या ताब्यात आहेत त्यांच्यावर ही जबाबदारी निश्चित करून हे गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत त्यात प्रामुख्याने महंत सेवेकरी व प्रशासकीय अधिकाऱ्यांचा देखील समावेश असून त्यांच्यावर देखील गुन्हे दाखल होणार आहेत.