धाराशिव – समय सारथी
धाराशिव नगर परिषदेचे तत्कालीन मुख्याधिकारी हरिकल्याण येलगट्टे यांच्या संपत्ती व मालमत्तेची लाचलुचपत विभागाकडुन उघड चौकशी करण्यास नगर विकास विभागाने परवानगी दिली आहे त्यामुळे यलगट्टे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. यलगट्टे यांच्यावर अनेक गुन्हे नोंद झाले असुन ते सध्या जामीनावर असुन निलंबित आहेत.
यलगट्टे यांनी भ्रष्टाचार करून करोडो रुपयांची अपसंपदा कमवल्याची तक्रार आमदार सुरेश धस यांनी केली होती, त्यांच्या गैरकारभाराबाबत विधीमंडळ अधिवेशनात तारांकित प्रश्न केला होता. दैनिक समय सारथी वृत्तपत्राने धाराशिव नगर परिषद व यलगट्टे यांचा कारभार वृत्तमालिकेतुन समोर आणला होता.
यलगट्टे यांच्या संपत्ती व इतर माहिती मिळवल्यावर लाचलुचपत विभागाने कारवाई करीत प्रस्ताव सादर केला होता. येलगट्टे यांच्याविरुध्द भ्रष्टाचार प्रतिबंध (संशोधन) अधिनियम, 1988 चे कलम 17 (अ) प्रमाणे उघड चौकशी करण्यास परवानगी देण्यात आली आहे. यलगट्टे यांची धाराशिव येथील कारकीर्द वादग्रस्त राहिली आहे.