धाराशिव – समय सारथी
24 लाखांची ऑनलाईन फसवणुक केल्याप्रकरणी धाराशिव सायबर पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला असुन व्हाट्सऍप फाईल पाठवुन डॉउनलोड केली व संस्थेच्या खात्यातील पैसे लुटण्यात आले. धाराशिव जिल्ह्यातील भुम तालुक्यातील तानाजी दत्तु भोसले यांची फसवणूक केली.
भोसले यांच्या मोबाईल वर मोबाईल क्रं 8218728676 च्या धाराकाने बॅकेतुन बोलत आहे असे सांगुन तुमचे आय. सी. आय. बॅक खाते आपडेट करायचे आहे असा बनाव करुन आधार कार्ड व पॅन कार्ड ची माहिती घेवून तसेच व्हॉटसअप आय डी बी आय बॅक ए पी के फाईल पाठवून ती डाउनलोड करणेस लावून फिर्यादी यांचे येडेश्वरी दुध डेअरी चे आयसीआयसीआय बॅक खात्यातुन 24 लाख 47 हजार 557 ऑनलाईन फसवणुक केली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-तानाजी भोसले यांनी 2 एप्रिल रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन सायबर पो ठाणे येथे भा.न्या.सं.कलम 318(4),सह कलम 66(सी), 66(डी) नुसार गुन्हा नोंद करण्यात आला.