धाराशिव – समय सारथी
तुळजापूर येथील ड्रग्ज तस्करी प्रकरणात पोलिसांनी आणखी एका माजी नगराध्यक्ष संतोष कदम परमेश्वर यांना आरोपी केले असुन आरोपीचा आकडा 35 वरून 36 झाला आहे. 36 पैकी 22 आरोपी फरार असुन 14 जन धाराशिव जेलमध्ये आहेत. माजी नगराध्यक्ष चंद्रकांत उर्फ बापु कणे, विनोद उर्फ पिटू विलास गंगणे, माजी सभापती शरद जमदडे,तस्कर इंद्रजीतसिंग उर्फ मिटू रणजीतसिंह ठाकुर,प्रसाद उर्फ गोटन कदम परमेश्वर, उदय शेटे, आबासाहेब गणराज पवार, अलोक शिंदे,अभिजीत गव्हाड, मुंबई येथील संतोष खोत व तुळजापूर येथील स्वराज उर्फ पिनू तेलंग, विनायक इंगळे,शाम भोसले,संदीप टोले,जगदीश पाटील,विशाल सोंजी, अभिजीत अमृतराव,दुर्गेश पवार,रणजित पाटील,नाना खुराडे व सोलापुर जिल्ह्यातील उपळाई येथील अर्जुन हजारे हे सर्व 22 आरोपी फरार असुन पोलिसांनी त्यांना कोर्टात फरार म्हणुन घोषित केले आहे, पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. धाराशिव कारागृहात 14 आरोपी असुन त्यात अमित उर्फ चिमू आरगडे,युवराज दळवी, संदीप राठोड, संगीता गोळे, संतोष खोत, विश्वनाथ उर्फ पिंटू मुळे, सयाजी चव्हाण, सुमित शिंदे, ऋतूराज गाडे, संकेत शिंदे, पुणे येथील सुल्तान उर्फ टिपू शेख, सोलापूर येथील जीवन साळुंके, राहुल कदम – परमेश्वर व गजानन हंगरगेकर यांचा समावेश आहे.