धाराशिव – समय सारथी
तुळजापूर येथील ड्रग्ज तस्करीच्या गुन्ह्यात विशाल सोंजी या आरोपीला अखेर पोलिसांनी अटक केली असुन तो गेली 6 महिने या गुन्ह्यात फरार होता. धाराशिव येथील कोर्टात त्याला हजर केल्यानंतर कोर्टाने त्याला 7 दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
तुळजापूर येथील ड्रग्ज तस्करी गुन्ह्यात 38 आरोपी असून त्यापैकी 36 आरोपीना अटक करण्यात पोलिसांना यश आले असुन मुंबई येथील मुख्य तस्कर वैभव गोळे व इंद्रजीतसिंह उर्फ मिटू ठाकुर हे 2 आरोपी फरार आहेत. तामलवाडी येथे 14 फेब्रुवारी रोजी धाराशिव पोलिसांनी कारवाई करीत ड्रग्ज पकडले त्यानंतर एकामागून एक खुलासे व आरोपी निष्पन्न होत त्यांना अटक झाली.
पोलिस अधीक्षक रितु खोखर, तत्कालीन पोलिस अधीक्षक संजय जाधव व अपर पोलीस अधीक्षक शफकत आमना, उपविभागीय अधिकारी डॉ निलेश देशमख, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक विनोद इज्जपवार यांच्या मार्गदर्शनाखाली तामलवाडी पोलिस निरीक्षक गोकुळ ठाकुर यांनी तपास करीत आहेत. जिल्हा सरकारी वकील ऍड महेंद्र देशमुख, ऍड सचिन सूर्यवंशी यांनी वेळोवेळी सरकारच्या वतीने कोर्टात सक्षम बाजु मांडली. स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनी सुदर्शन कासार यांनी गुन्हा नोंद केला, गुन्हा, आरोपी निष्पन्न व अटकेत स्थानिक गुन्हे शाखेचे मोठे योगदान आहे.












