धाराशिव – समय सारथी
तुळजापूर येथील ड्रग्ज तस्करीत पोलिसांनी गजानन उर्फ हांग्या प्रदीप हंगरकर या आरोपीला अटक केले असुन त्याला आज कोर्टात हजर केले जाणार आहे. ड्रग्ज तस्करीत इतर 11 आरोपी फरार असुन पोलिसांनी त्यांचा शोध सुरु केला आहे. पोलीस तपासात 25 आरोपी निष्पन्न झाले असुन तपास सुरु असल्याने आरोपींची संख्या वाढणार आहे, पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवल्याने तुळजापुरातील अनेक जण नॉट रिचेबल झाले आहेत. माजी नगराध्यक्ष चंद्रकांत उर्फ बापु कणे, विनोद उर्फ पिटू विलास गंगणे, माजी सभापती शरद जमदडे यांच्यासह इंद्रजीतसिंग उर्फ मिटू रणजीतसिंह ठाकुर या फरार आरोपींचा शोध सुरु आहे. ड्रग्ज तस्करीत 25 जन आरोपी असुन 11 जन फरार आहेत, 10 जन जेलमध्ये तर 3 जन पोलिस कोठडीत व 1 अटकेत आहेत.
पोलिसांनी गोपनीय ठेवलेले 4 आरोपी कोर्टात जाहीर केले असुन 7 नंबरचा आरोपी इंद्रजीतसिंग उर्फ मिटू रणजीतसिंह ठाकुर, नळदुर्ग, 10 नंबर आरोपी म्हणुन चंद्रकांत उर्फ बापु कणे, 11 नंबर प्रसाद उर्फ गोटन कदम परमेश्वर, 12 नंबर आरोपी म्हणुन उदय शेटे याचे नाव उघड केले आहे. या 4 गोपनीय नावासोबत नवीन 6 आरोपीत 20 नंबर आरोपी म्हणुन विनोद उर्फ पिटू विलास गंगणे, 21 नंबरला गजानन उर्फ हांग्या प्रदीप हंगरकर, 22 ला शरद रामकृष्ण जमदडे, 23 ला आबासाहेब गणराज पवार, 24 ला अलोक शिंदे व 25 नंबर आरोपी म्हणुन अभिजीत गव्हाड याची नावे जाहीर केली आहेत. मुंबई येथील संतोष खोत व तुळजापूर येथील स्वराज उर्फ पिनू तेलंग हे सर्व 11 आरोपी फरार असुन पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.
पालकमंत्री प्रतापराव सरनाईक, खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार कैलास पाटील यांनी ड्रग्ज प्रकरणी संसद, विधीमंडळात आवाज उठवला. आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांनी 3 वेळेस ड्रग्ज तस्करीबाबत लागणारी माहिती, टीप पोलिसांना दिली त्यामुळे तुळजापुरात वाढत असलेल्या ड्रग्ज रॅकेटचा भांडाफोड झाला. काही राजकीय पक्षाशी व व्यक्तीशी संबंधित आरोपी असले तरी ते उघड झाल्याने ड्रग्ज तस्करीची कीड नष्ट होईल अशी आशा आहे. पोलिस अधीक्षक संजय जाधव व अपर पोलीस अधीक्षक शफकत आमना मॅडम, तत्कालीन अपर पोलिस अधीक्षक गौहर हसन, उपविभागीय अधिकारी डॉ निलेश देशमुख हे स्वतः यावर लक्ष ठेवुन आहेत. जिल्हा सरकारी वकील ऍड महेंद्र देशमुख हे सरकारच्या वतीने कोर्टात सक्षम बाजु मांडत आहेत. तामलवाडी पोलिस निरीक्षक गोकुळ ठाकुर हे तपास करीत आहेत. या सर्व टीमच्या तपासामुळे रॅकेटचा भांडाफोड झाला.
स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि सुदर्शन कासार व त्यांचे पथक हे तुळजापूर उपविभागात गस्त करीत असताना त्यांना गोपनीय बातमीदाराकडून माहिती मिळाली त्यानंतर कारवाई करण्यात आली. पोउपनि लोंढे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस हवालदार शौकत पठाण, प्रकाश औताडे, फहरान पठाण, जावेद काझी, चालक रत्नदिप डोंगरे, नितीन भोसले, तामलवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस अंमलदार माने, सलगर, सुरनर, चौगुले, चालक शेख यांच्या पथकाने केली आहे.