धाराशिव – समय सारथी
धाराशिव,कळंब व तुळजापूर येथे भाजप सोबत जागा वाटपात घातलेल्या गोंधळानंतर उमरगा येथे काय होणार याची उत्सुकता लागली आहे. शिवसेना भाजप की शिवसेना काँग्रेस हे समीकरण ठरणार आहे हे पाहावे लागेल. बैठकांचे सत्र सुरु असुन जागा वाटपाच्या सूत्रावर सगळे ठरणार आहे. उमरगा लोहारा येथे जिल्हा परिषदेच्या 13 जागा आहेत.
नुकत्याच झालेल्या नगर परिषद निवडणुकीत व मागील वेळीच्या जिल्हा परिषदेचा अनुभव पाहता शिवसेना भाजप सख्या तितकेसे नाही. संपर्कप्रमुख राजन साळवी यांच्यासह वरिष्ठ नेत्यांनी भाजप शिवसेना युतीची घोषणा केल्याने उमरगा येथे काय होते हे पाहावे लागेल. माजी खासदार रवींद्र गायकवाड यांचा निर्णय अंतीम असणार आहे. चौगुले हे आजवर गायकवाड यांच्या निर्णयासोबत राहिले आहेत. संपर्कप्रमुख साळवी पॅटर्नने संभ्रम निर्माण झाला आहे.
भुम परंडा वाशी या 3 तालुक्यातील एबी फॉर्म आमदार सावंत यांच्याकडे तर धाराशिव, कळंब, तुळजापूर या 3 तालुक्याचे एबीफॉर्म संपर्कप्रमुख साळवी यांच्या ताब्यात आहेत. उमरगा लोहाराचे माजी आमदार चौगुले यांच्याकडे असुन ते तिथे भाजप की काँग्रेस सोबत जाणार असा निर्णय घेणार आहेत. एबी फॉर्मसह साळवी उमरग्यात तळ ठोकून आहेत, ‘शब्दप्रभु’ अशी ओळख असलेल्या माजी खासदार रवींद्र गायकवाड यांना डावलून तिथे कोणता गोंधळ होतो का ? याकडे लक्ष लागले आहे.












