मोदी हे नाटकी व बदमाश – हिंदू खतरेमें हा कांगावा, 159 कुटुंबात सत्ता
धाराशिव – समय सारथी
जुन्या काळी सत्ता ही देवळात होती व पूजारी ते चालवत होते मात्र आता आधुनिक काळात सत्ता केंद्र हे बदलले असु ते विधानसभा येथे आहे.शिवाजी महाराज यांचा राज्य स्थापन झाले त्या काळात राजाच मानसन्मान तेव्हाच झाला जेव्हा धर्माने त्यांना स्वीकारल म्हणजे राज्य अभिषेक केला, तोपर्यंत मान्यता मिळाली नाही. सत्तेच केंद्र बदललं असुन भटजीकडे असलेले केंद्र निवडून आलेले आमदार व खासदार यांच्याकडे गेले आहे
आरक्षण वाचवणार कसे हा महत्वचा भाग आहे त्याचं बरोबर या आरक्षणमधून लोकांचा विकास झाला पाहिजे असे प्रकाश आंबेडकर म्हणाले, ते ओबीसी यल्गार मेळाव्यात बोलत होते.
आमदार खासदार व्हायचं असेल तर उमेदवारी मिळाली पाहीजे, आपण निवडणुक उभा राहतो, जिंकलं की खासदार आमदार होतो. मी 1990 पासुन सांगत आहे महाराष्ट्रची सत्ता 159 कुटुंबात आहे. जिल्हा बँक, जिल्हा परिषद,बाजार समिती,पतसंस्था, आमदार व खासदार अशे 159 कुटुंबात सत्ता आहे. नातेगोत्यात सत्ता संबंध आहेत. 159 कुटुंबात अडकलेल्या सत्तेला सोडवायचं आहे व त्याला सामान्य लोकात द्यायचं आहे असे आंबेडकर म्हणाले.
मोदी यांच्यावर टीका करताना ते म्हणाले की, 11 दिवस उपवास केल्याने कोणी चांगला झाला असे नाही. 15 दिवस उपास केला तरी कोणी मारणार नाही, फार मोठे पूण्य केले असे समजून फ़सू नका, जे आरक्षण मिळाले ते निघुन जाईल. आरक्षणवादी महत्वाचे असुन दुसऱ्या बाजूला त्यांनी ओबीसी लोकांना उमेदवारी दिली पाहिजे.
उद्याचे सत्ताधारी आपण होणार आहोत, आरक्षण बाहेर असलेल्या लोकांचे दुःख पण समजून घेतले पाहिजे.
भाजप काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना हे पक्ष, त्यांनी निवडणूकीत उभे केलेले उमेदवार व निवडून आलेले खासदार पाहिजे तर एक खासदार धनगर, माळी, बारा बलुतेदार समाजाचा दिसत नाही. खासदारच नसेल तर आरक्षण कसे वाचेल असा प्रश्न करीत लोकसभा विधानसभा निवडणूकीत आरक्षणवादी नसेल तर आरक्षण कसे टिकेल असे आंबेडकर म्हणाले.
आंधळेपणाने विश्वास न ठेवता डोळस वागा.देवाची पूजा करणारा सगळयात बदमाश असतो, पूजेचे प्रदर्शन, टीव्हीवर दाखवतो तो सगळ्यात नाटकी माणूस म्हणून त्यांच्यापासुन वाचले पाहीजे, सावध राहिले पाहीजे हेच घात करतात. त्यांची संघटना, पक्ष माझ्या हिताची आहे का हे पाहावे.
48 जागा पैकी राखीव 3 जागा आदिवासी समाजाला व 41 जागा पैकी धनगर वंजारी यांना किमान 12-13-14-15 उमेदवार देईल तोच आपला पक्ष असे माना. कबाब, शबाब व महात्मा गांधी म्हणजे नोटांचे वाटप केले जाईल याला जर बळी पडलात तर आरक्षण सोडा, हे संविधान सुद्धा जाईल. फुले यांना आजही शिव्या, निंदा, चेष्टा केली जाते. या देशाची गुलामीची व्यवस्था, जातीची स्त्री शिक्षण व्यवस्था त्याला उलटून लावले व बाबासाहेब यांनी त्याला पुन्हा येऊ नये म्हणून कायम स्वरूप म्हणून कायद्याचा स्टॅम्प मारला. त्यांच्यावर विडंबन करणारे लिखाण केले जाते.
आज पुन्हा ही लढाई सुरुवात झाली आहे, संविधान बदलण्याची भाषा केली जात आहे. शिवाजी महाराज हे सामाजिक स्वतंत्र आहे तोपर्यंत लोकांच्या मनात जिवंत राहतील, ही व्यवस्था ठेवायची की नाही हे ठरवा. समाज व्यवस्था बदलली आहे. मराठा ओबीसी वाद सुरु आहे.
2 महिन्यात लोकसभा आहे 12-13 खासदार ओबीसी नाही गेले आरक्षण धोक्यात येईल असे म्हणाले. मग भुजबळ सारखे कितीही लढणारे असतील तर फरक पडणार नाही. माझं मत आरक्षणवादी अशी भुमिका घेतली पाहिले.
तुम्ही मुसलमान होणार नसाल तर धर्म कसा धोक्यात आला, कसला धोका नाही. हिंदू खतरेमे असे म्हणले जाते मात्र कसला धोका नाही. मुख्य न्यायाधीश चंद्रचूड, पंतप्रधान मोदी, आर्मी चीफ हे मुस्लिम आहेत का ? मुख्य पदे ही हिंदूकडे असल्याने धर्म धोक्यात नाही, हा कांगावा केला गेला आहे त्यांना पुन्हा मनुवाद सुरु करायचा आहे. कुठला धर्म, देवीला विरोध करायचा नाही. आमचं मत कोणाला आरक्षण वाद्याला, मत पेटीत टाका असे सांगत भाषण शेवट केला.