धाराशिव – समय सारथी
धाराशिव तालुक्यातील जागजी येथे एनव्हीपी शुगरच्या पहिल्या गळीत हंगामाचा शुभारंभ उद्या रविवारी सकाळी 10.30 वाजता खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यासह अन्य मान्यवरांच्या हस्ते होणार असुन या कार्यक्रमास उपस्थितीत राहण्याचे आवाहन एनव्हीपी शुगरचे सर्वेसर्वा अप्पासाहेब पाटील, नानासाहेब पाटील व धनंजय पाटील यांनी केले आहे.
खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्या प्रमुख उपस्थिती हभप नवनाथ महाराज चिखलीकर,ज्येष्ठ नागरिक रंगनाथ सावंत, ऊस उत्पादक शेतकरी हनुमंतराव देशमुख,काकासाहेब डांगे,तानाजी मगर,भारत लोमटे,शिवाजी पाटील,अभिजीत मगर,शिवाजी साळुंखे,आत्माराम सरडे,अनरथ भोसले,तळशीदास जमाले,बाबासाहेब शिंदे,ऊस वाहतूक ठेकेदार काकासाहेब मिसाळ,जहांगीर सय्यद यांच्या हस्ते या कारखान्याच्या पहिल्या गळीत हंगामाचा शुभारंभ करण्यात येणार आहे.
कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषदचे माजी उपाध्यक्ष बाबा पाटील,हिम्मतराव पाटील,कुलदीप विटेकर,सीए सचिन शिंदे यांची उपस्थिती राहणार आहे . परिसरातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने कारखानास्थळी उपस्थित रहावे असे आवाहन एनव्हीपी शुगरचे सर्वेसर्वा आप्पासाहेब पाटील,नानासाहेब पाटील व धनंजय पाटील यांनी केले आहे.
पाटील बंधूंनी अवघ्या 10 महिन्यामध्ये कारखाना उभारला असुन रविवारी कारखान्याच्या गळीत हंगामास प्रत्यक्षात सुरुवात होणार आहे यामुळे ऊस उत्पादक शेतकरी यांची सोय होणार आहे.