धाराशिव – समय सारथी
धाराशिव शहरातील स्वच्छतेचा प्रश्न मोठा बिकट झाला आहे, नगर पालिकेच्या माध्यमातून ठेकेदारांमार्फत करण्यात येणारी स्वच्छता ठप्प झाली आहे. कारण ठेकेदाराच्या ठेक्याची मुदत संपल्यामुळे स्वच्छता यंत्रणा कोलमडले आहे. त्यामुळे रस्त्या रस्त्यावर कचऱ्याचे ढीग लाघल्याचे दिसत आहे. यावर तोडगा काढण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ सचिन ओंबासे यांनी उद्या शुक्रवार 12 जानेवारी रोजी माजी नगरसेवक नागरिक यांची जिल्हाधिकाऱ्यांच्या सभागृहात बैठक आयोजित केली होती.
काही कारणास्तव ती बैठक पुढे ढकलण्यात आली असून 22 जानेवारी रोजी या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. ही बैठक जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात दुपारी बारा वाजता होणार आहे. या बैठकीसाठी माजी नगरसेवक नागरिक व पत्रकारांनी उपस्थित राहावे अशी आवाहन नगर पालिकेच्या मुख्याधिकारी वसुधा फड यांनी केले आहे.