धाराशिव – समय सारथी
धाराशिव जिल्ह्यातील सर्व नगर परिषदेच्या 2025 मध्ये होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रारुप प्रभागाच्या भौगोलिक सीमा प्रसिध्द करण्यासाठी आणि त्यावर हरकती व सूचना मागविण्यासाठी कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.
प्रभागाच्या भौगोलिक सीमा प्रसिध्दीची अधिसूचना 18 ऑगस्ट रोजी प्रसिद्धी करण्यात आली आहे. हरकती व सुचना 18 ऑगस्ट ते 31 ऑगस्ट दुपारी 3 वाजेपर्यंत सादर करायच्या आहेत. या हरकती व सुचना मुख्याधिकारी नगर परिषद यांच्याकडे सादर करायच्या आहेत. हरकती व सूचना दाखल करणाऱ्य ा नागरिकांना सुनावणी करिता उपस्थित राहण्यासाठी स्वतंत्रपणे कळविण्यात येणार आहे.