तुळजापूर – समय सारथी
तुळजापूर नगरपरिषद मालकीच्या भूखंडावर लातूर येथील सुनील फर्म इंजिनियर कंपनीने करारातील अटी व शर्तीचा भंग करून नगरपालिकेचे आर्थिक फसवणूक केल्याबाबत येथील सामाजिक कार्यकर्ते विशाल विजय रोचकरी यानी केलेल्या तक्रारीवरून नगरपरिषदेने लातूर येथील या कंपनीस नोटीस दिली आहे. सदर तक्रारीच्या अनुषंगाने आपले म्हणणे मांडण्यास उपस्थित राहण्याची नोटीसद्वारे कळवण्यात आले आहे अन्यथा कंपनी विरोधात योग्य ती कारवाई करण्यात येईल असे नोटशीद्वारे म्हटले आहे.
तुळजापूर येथील जुन्या बसस्थानक जवळ असलेल्या नगरपरिषद मालकीच्या भूखंडावर लातूर येथील सुनील फार्म इंजिनिअर कंपनीच्या वतीने सुनील प्लाझा ही व्यापारी गाळे असलेले इमारत कराराद्वारे उभारण्यात आली परंतु बनावट कागदपत्र आधारे व नगररचनाकार यांनी मंजूर केलेल्या रेखा नकाशा नुसार बांधकाम न करता तसेच करारनाम्यातील व अटी व शर्तीचा भंग करण्यात आल्याचे कंपनीवर आरोप करण्यात आले.
तुळजापूर पोलीस स्टेशनसह वरिष्ठ प्रशासनाकडे या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली तसेच याप्रकरणी तुळजापूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर 304/ 2018 या गुन्ह्यात आरोपी असताना देखील कंपनीने गाळेधारकांकडून अद्याप पावेतो भाडे स्वरूपात दरमहा पैसे वसूल करत असल्याची तक्रार रोचकरी यांनी केली. त्यामुळे नगरपालिकेचे आणखी फसवणूक होऊन आर्थिक नुकसान होत आहे तरी यात गुंतलेल्या संबंधितावर आर्थिक अपहार संबंधी लवकरात लवकर आवश्यक ती कारवाई करण्यासंबंधी मुख्याधिकारी व जिल्हाधिकारी यांनी सूचित करावे असे कळविले.तसेच
नगरपरिषद मालकी भूखंडावर या कंपनीने करारनाम्यातील व शर्तीचा बंद केल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले. त्यांच्या या तक्रारीची दखल घेत नगरपरिषदेने सदर कंपनी विरोधात नोटीस बजावली असून समक्ष उपस्थित राहून म्हणणे मांडण्यास व गाळे भाडे नगरपरिषदेकडे जमा करण्याविषयी कळविण्यात आले आहे नसता योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल नोटीसीचे गंभीर नोंद घेण्याचे कळवण्यात आले आहे.