धाराशिव – समय सारथी
तुळजापूर येथील पुजारी व ड्रग्ज असा कोणताही संबंध नाही, सर्व पुजाऱ्यांना बदनाम करण्याचे हे षडयंत्र आहे. ड्रग्ज बाबत गेल्या 3 वर्षांपासुन पुजारी व पुजारी मंडळ बैठका घेऊन आंदोलन, निवेदन व विविध माध्यमातून आवाज उठवत आहे अशी प्रतिक्रिया पाळीकर पुजारी मंडळाचे अध्यक्ष विपीन शिंदे, भोपे पुजारी मंडळाचे अध्यक्ष अमर राजे परमेश्वर कदम, पक्षाळ पुजारी मंडळाचे अध्यक्ष विशाल रोचकरी व सामाजिक कार्यकर्ते नागनाथ भाऊ भांजी यांसह इतरांनी दिली आहे.
ड्रग्ज तस्करी प्रकरण पुजाऱ्यांनी बाहेर काढले आहे, यात पोलिसांची भुमिका अजूनही संशयास्पद आहे. ड्रग्ज तस्करा सोबत ज्याचे आर्थिक व्यवहार झाले आहेत त्यांना यात जवळचा लांबचा न पाहता कारवाई झाली पाहिजे, कोर्ट त्यांना दोषी किंवा निर्दोष ठरवेल त्यांचे त्यावेळी आम्ही स्वागत करू. सध्या ड्रग्ज कारवाई नावाखाली मोठी आर्थिक देवाण घेवाण होत असल्याची चर्चा आहे. कोर्ट त्यांना चुकीची बातमी देऊन पुजारी बदनामी थांबवली पाहिजे असे भोपे पुजारी मंडळाचे अध्यक्ष अमर राजे कदम यांनी सांगत इशारा दिला. देऊळ ए कवायत हा नियम आतील कामासाठी आहे, तो बाहेर लागु नाही त्यामुळे तसे आम्ही होऊ देणार नाही असेही ते म्हणाले.
पुजाऱ्यांना बदनाम करणे हा एक पोलिस षडयंत्रचा भाग वाटतो, व्यक्ती दोषी चुकीचा असु शकतो मात्र समुदाय दोषी नसतो, पोलिसांना काही गोष्टी बाहेर येऊ द्यायच्या नसतील, त्या दाबायच्या असतील अशी शंका येते त्यामुळे हे सुरु केले आहे. असे जर असेल तर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना भेटून यात सखोल तपासासाठी एसआयटी नेमण्याची मागणी करू, आम्ही यात तक्रारदार आहोत, पुजारी यांची जी नावे आली त्याचा निषेध करतो असे देवीचे सेवेकरी महेश चोपदार यांनी सांगितले.
ड्रग्ज पासुन तुळजापूर वाचवा हा देखावा मंडळाने केला होता त्यावेळी जिल्हाधिकारी, पोलिस प्रशासन व प्रसार माध्यम गप्प का होती असा सवाल त्यांनी केला. एका पुजाऱ्याने ड्रग्जचा विषय बैठकीत तत्कालीन पोलिस अधीक्षक यांच्यासमोर जाहीर मांडला, काही गोपनीय नावे दिली, पुजाऱ्यांनी लेखी पत्रव्यवहार केला तेव्हा का कारवाई केली नाही. ड्रग्ज मुक्तीसाठी आमचा कायम पुढाकार राहिला आहे, तामलवाडी येथे ड्रग्ज पकडल्यावर आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन केले, त्यावेळी पोलिसांनी धमकावले तेव्हा सगळे गप्प होते. काही आरोपीमुळे पुजाऱ्याची बदनामी करू नये असेही ते म्हणाले. तुळजाभवानी देवी ही महाराष्ट्राची कुलस्वामिनी असुन भक्तांची श्रद्धा कायम राहिली पाहिजे. देऊळ ए कवायत कायदा हा मंदिरातील वार्तनावर असल्यामुळे त्याचा आधार घेऊन बदनामी केली जाते असा आरोप शिंदे केला.
ड्रग्जबाबत सुरुवातीला पुजाऱ्यांनी आवाज उठवला, त्यात कोण अडकले आहे, जात, धर्म, राजकीय पक्ष याचा विचार न करता पाठपुरावा केला. तुळजापूर येथील चुकीच्या बाबीला आळा बसावा म्हणुन कायम पुढाकार घेतला आहे. ड्रग्ज व इतर चुकीच्या बाबीवर आम्ही सतत लढा देणार आहोत, एकामुळे सदेव पुजाऱ्यांना दोषी ठरवू नये. ड्रग्जमध्ये कोणीही असो त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे असे म्हणत पुजारी वर्गाची बदनामी थांबवा असे नागनाथ भाऊ भांजी यांनी सांगितले. भोपे, पाळीकर व उपाध्ये हे तिन्ही पुजारी मंडळ व नागरिक यांनी उठाव केला तेव्हा हे सगळे समोर आले, त्यांचा ड्रग्जचा संबंध नाही असे ते म्हणाले.
पुजारी व ड्रग्ज हा विषय वेगळा आहे, विनाकारण पुजारी, तुळजाभवानी व तुळजापूरची बदनामी केली जाते. देऊळ ए कवायत हा नियम मंदिरातील रूढी परंपरा व वर्तन बाबत आहे, बाहेर कोण काय केले तर तो वयक्तिक दोषी आहे त्याचा पुजारी व तुळजाभवानी देवी याच्याशी संबंध नाही. भाविक व पुजारी यात गैरसमज निर्माण करुन संभ्रम निर्माण केला जातो आहे असे म्हणत तुळजाभवानी व पुजारी वर्गाची बदनामी थांबवा असे प्रक्षाळ पुजारी मंडळाचे अध्यक्ष विशाल रोचकरी यांनी म्हणटले आहे.
एकदरीत सर्व पुजारी यांना बदनाम करुन ड्रग्ज तस्करी हा मुळ गंभीर सामाजिक विषय बाजूला करण्याचा काही जणांचा डाव असल्याचे दिसते, ही कल्पना व उद्योग कोणाचा हेही आगामी काळात समोर येणे गरजेचे आहे. गुन्हा नोंद असलेल्या पैकी काही जन जरी पुजारी असतील तर जोपर्यंत कोर्ट त्यांना निकाल देऊन दोषी ठरवत नाही तोपर्यंत त्यांच्यावर इतर कारवाई होणे देखील नियमानुसार योग्य ठरणार नाही असेही मत व्यक्त होत आहे. आरोपींची नावे निष्पन्न झाल्यावर महिनाभराच्या काळात, प्रशासनाने, प्रसार माध्यम व इतर कोणीही ड्रग्ज व पुजाऱ्याशी संबंध जोडला नाही मग अचानक ही कल्पना कोणाला व का सुचली. पुजाऱ्यावर कारवाई करा असा अठ्ठास कोणाचा आणि का हाही एक प्रश्न आहे. ड्रग्ज हा राजकीय, व्यक्तीक द्वेष काढण्याचा विषय नसुन सामाजिक चिंतेचा विषय आहे.