धाराशिव – समय सारथी
श्री तुळजाभवानी मंदिर मधील उपदेवतांच्या देवतांच्या मूर्ती मंदिर संस्थान प्रशासनाने थेट मंदिरच्या बाहेर हलविल्यामुळे हिंदुराष्ट्र सेनेच्या वतीने निवेदन देण्यात आले आहे
श्री तुळजाभवानी मंदिर मधील मंदिर पोलीस चौकी येथे पूर्वापार असलेल्या सर्व मुख्य उप देवतांच्या मूर्ती मंदीर परिसर विकास चालू असल्याने मंदिर प्रशासनाने काढल्या व थेट मंदिरच्या पापणास तीर्थ येथील मंदिरात ठेवल्या. ही घटना घडल्या नंतर हिंदू संघटनांनी संताप व्यक्त करत श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानचे अध्यक्ष, पालकमंत्री, आमदार , मंदिर व्यवस्थापक यांना तात्काळ सर्व देवी देवतांच्या मूर्ती मंदिरमध्ये आणून ठेवाव्यात व पूर्वीचे स्थान निश्चित करून धार्मिक विधीवत पुनर्स्थापना करावी,तसेच अशी बेजबाबदार घटना ज्या अधिकारि व कर्मचारी यांच्यामुळे घडली आहे त्यांचे निलंबन करण्याची मागणी केली आहे.
मंदिर संस्थानच्या अधिकाऱ्यांनी स्वतःच्या पदाचा गैरवापर करून हुकूमशाही पध्दतीने केलेल्या या कृतीमुळे तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी हिंदुराष्ट्र सेनेच्या वतीने देण्यात आला. यावेळी परीक्षित साळुंके,शिवाजी बोधले,अमोल कुतवळ,अक्षय परमेश्वर, सुदर्शन वाघमारे,प्रदीप इंगळे, नितीन भांजी,सौरभ कदम,अभिजित कुतवळ,नागेश किवडे,सचिन बागल,महेश अंबुलगे,सर्वोत्तम जेवळीकर,शंतनू नरवडे आदी उपस्थित होते.