धाराशिव – समय सारथी
धाराशिव जिल्यातील माकणी येथील निम्न तेरणा प्रकल्पावरील तेरणा उपसा सिंचन योजना दुरुस्त करून कार्यान्वित करावी यां मागणीसाठी 24 गावातील सरपंच व शेतकरी यांनी आक्रमक पवित्रा घेतला असुन जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांना निवेदन दिले. गेल्या पंचवीस वर्षापासून या प्रकल्पाकडे दुर्लक्ष होऊन याचा वापर झालेला नाही याचा परिणाम म्हणून एकूण 24 खेड्यातील 7 हजार हेक्टर शेती क्षेत्र दुष्काळाचा सामना करत आहे.
करजखेडा,पाटोदा,भंडारी,गोगाव,ककासपूर,तोरंबा,ताकविकी,बामणी,बामणीवाडी,बरमगाव,वडाळा,विठ्ठलवाडी,उमरेगव्हाण,पंचगव्हाण,महादेववाडी,नांदुर्गा,कनगरा,म्हाळगी ,केशेगाव,धुत्ता कानेगाव,आरणी, उजनी आणि आशिव या गावातील ग्रामस्थ, शेतकरी यांनी निवेदन दिले.या गावांमध्ये टँकरसदृश्य परिस्थिती असून पाणी उपलब्ध नाही. प्रामुख्याने ऊस क्षेत्र असलेला हा भाग आहे,केवळ पाणी नसल्यामुळे ऊस क्षेत्र धोक्यात आले आहे .
तेरणा उपसा सिंचन योजनेचे पाच पंपहाऊस उभारणी व त्या प्रकल्पाचे पाणी वितरण करण्यासाठी बांधलेले कालवे यासाठी मोठ्या रकमेची भांडवली गुतवणूक झालेली आहे. 24 गावातून या योजनेचे कॅनल गेलेले आहेत. योजनेत शासनाचे भांडवल पडून असून याच्या देखभालीचा खर्च पाहता ही योजना चालू करणे है टँकरमुक्ती आणि शेती उत्पन्न वाढून शेतकऱ्यांना कायमस्वरूपी समृद्ध करणारी आहे.
हा प्रकल्प दुरुस्ती होऊन वापरात आल्यास सर्व लाभार्थी शेतकरी प्रवर्तक म्हणून कार्यरत आसलेल्या पाणी वापर संस्थांच्या माध्यमातून पाणी वापर देखभाल दुरुस्ती आणि संरक्षण याची जबाबदारी घेण्यास तयार आहेत असे निवेदनात म्हण्टले आहे.
गेली दोन वर्ष हक्काच्या पाण्यासाठी वंचित असलेल्या शेतकऱ्यांच्या वतीने वारवार लोकप्रतिनिधींना निवेदने दिली आहेत परंतु कोणीही या मागणीला गंभीर घेतलेले दिसत नाही सध्या शेतकऱ्यांच्या भावना तीव्र असून यासाठी सर्वसमावेशक संघर्ष समिती स्थापन केलेली आहे यावेळी या मागणीकडे दुर्लक्ष झाले तर शासनास तीव्र आंदोलनास सामोरे जावे लागेल असा इशारा दिला आहे.
दुष्काळात होरपळत असलेल्या शेतकऱ्यांना आंदोलनाची वेळ येऊ नये म्हणून तात्काळ या समस्येबाबत संबंधित यंत्रणेला आदेश द्यावेत अशी मागणी केली आहे.