तुळजाभवानी देवीच्या मंदीर परिसराची केली पाहणी, भुमिका स्पष्ट – डॉ पद्मसिंह पाटील माझे वडील, राणा विषयी बोलू नका
तुळजापूर – समय सारथी
राष्ट्रवादीचे आमदार माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी तुळजाभवानी मातेच्या मंदीर परिसराची पाहणी करून स्पष्ट केली. गाभाऱ्याला इतिहासिक, पौराणिक, श्रद्धेचा संबंध आहे, कोणत्याही स्तिथीत दगडाला हात लावायचा नाही, मी महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातील जाऊन भक्तांना आवाहन करणार आहे की चला एकत्र येऊया मंदीर वाचवूया, धर्म कोणाच्या बापाचा नसुन ते ज्या धर्माचे आहेत त्याचं धर्माचा मी आहे असे ते म्हणाले.
अकुशल कामगार वापरून हजारो वर्ष जुने असलेल्या तुळजाभवानी देवीच्या मंदिराच्या बांधकामाला धक्का लागला आहे, कोरीव दगडाच्या इतिहासाला जगात कुठेही धक्का लावला जात नाही. काही दगडाना भेगा पडल्या आहेत. ज्या गाभाऱ्यात स्वतः छत्रपती शिवाजी महाराज यांनी आशीर्वाद घेऊन रयतेचे राज्य स्थापन केले तो गाभारा तोडायचा ? या सभा मंडप, पायऱ्या यांचा इतिहास 12 व्या शतकात सापडतो. हजारो वर्ष मंदिराचा इतिहास आहे, संदर्भ त्रेता युगापर्यंत आहेत. हजारो मंदिरे आहेत मात्र त्यांना तडा गेला नाही.
विकासाच्या नावाखाली, जो कोणी हे करत असेल त्याचा दर 5 वर्षांनी 200 कोटी रुपयांचा घरभरणी कार्यक्रम सुरु झाला, त्यांना इतकी भीक लागली आहे. मंदिराच्या भक्तांकडुन आलेल्या पैशातून यांची मौज मजा सुरु आहे. माझ्याकडे सिन्हा नावाच्या पुरातत्व विभागाच्या अधिकारी याचा अहवाल आहे, काही हजार रुपयात हे मंदीर कोणतेही नुकसान न करता दुरुस्ती करू शकतो. उध्वस्त करून एकायचे ही कुठली संकल्पना. तडे गेले कसे, ड्रीलिंग मशीन वापरली त्यामुळे असे झाल्याचा आरोप आव्हाड यांनी केला.
एक एक दगडी भिंत साडे चार फुट रुंद आहेत, त्यावेळी स्थापत्य शास्त्र वापरून कळस, भिंती मजबूत बनवल्या आहेत. भविष्यात त्यांना वाटले तर पंढरपूरचे मंदीर दुसरीकडे कुठे लांब घेऊन जातील. कोण तरी पुजारी येतो, तलवारीची पुजा करतो व शक्ती त्यात ठेवतो हे काय सुरु आहे असा सवाल त्यांनी केला. हे मंदीर आहे तसे ठेवुन इतर हवी ती दुरुस्ती करा. मी इथे देवीभक्त म्हणुन आलो आहे, कोणत्याही पक्षाचा संबंध इथे नाही. माझ्या सोबत इथले स्थानिक आमदार, खासदार आले नाहीत, भक्त सोबत आले आहेत.
भोपे पुजारी सोडून इतर कोणी पुजा केली होती का? ही परंपरा का बदलत आहोत. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळात पुजा केल्या व्यक्तींची कुटुंबे आजही इथे पुजा करतात. या मागे जो कोणी असेल त्यांनी काढता पाय घ्यावा ही देवी साक्षात इथे आहे. जेव्हा पासुन मंदिराला हात लागला आहे तेव्हा गोमूखातून सारखे पानी येत आहे. लोकांच्या श्रद्धेला हात लावू नाही, लग्न झाल्यावर गोंधळ घालणे ही आपली परंपरा आहे मात्र तो मंडपच तोडून टाकला आहे. ज्या दगडानी छत्रपती शिवाजी महाराज, अहिल्यादेवी होळकर, निंबाळकर यांना बघितले त्या दगडांना हलविणारे हे कोण ? हे आम्हाला मान्य नाही.
पैशाची किती लालसा, लालच आहे, त्यांनी काय पुरातत्व विभाग हातात घेतला आहे का? काय सुधारणा करायची आहे ती करा मात्र ज्या मागे ऐतिहासिक संदर्भ आहे त्यात बदल करू नका. छत्रपती शिवाजी महाराज यांचा साक्षीदार असलेला दगड उचलून फेकून द्यायचा. ती देवी ह्यांना उचलून फेकून देईल, हे पाप घेऊ नका. जे करायचे आहे ते करा मात्र देवीच्या गाभाऱ्याला हात लावायचा नाही.आम्ही पुरोगामी आहोत पण आम्ही निरईश्वरवादी नाहीत. मी हिंदू आहे मात्र सनातन हिंदू नाही. मी सनातनी हिंदू होऊ शकत नाही.
डॉ पद्मसिंह पाटील माझे वडील, राणा विषयी बोलू नका –
मी डॉ पद्मसिंह पाटील यांना वडील मानतो राजकारणाच्या पलीकडे त्यांचे संबंध आहेत. मी आजही पद्मसिंह पाटील यांना माझा बाप मानतो, मी हे जाहीररित्या सांगतो.मला सांगताना लाज वाटत नाही. मी माझ्या बापाच्या विरोधात भुमिका घेणारा माणुस आहे. त्यांचे चिरंजीव आमदार राणाजगजीतसिंह पाटील हे काय करतात मला विचारू नका. डॉ पाटील यांचे संबंध आहेत म्हणुन मी तत्व सोडू का ? मी स्पष्ट भुमिका जाहीर केली आहे. मला असे घरगुती प्रश्न विचारू नका असे ते पत्रकरांना म्हणाले. माझे भाजपात अनेक मित्र आहेत म्हणुन मी भाजपात सहभागी होऊ का? मानवात द्वेष, दरी निर्माण व्हावी यासाठी राज्य व्यवस्था प्रयत्न करीत असल्याचा आरोप त्यांनी केला.