तुळजापूर – समय सारथी
तुळजापूर तालुक्यातील ज्येष्ठ नेते तथा विधान परिषदेचे माजी सदस्य नरेंद्र बोरगांवकर यांचे वृद्धापकाळाने निधन झाले असुन त्यांच्यावर दुपारी 4.30 वाजता तुळजापूर रोडवरील मोतीझरा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत, त्यांच्या निधनाने हळहळ व्यक्त होत आहे. राजकीय, शिक्षण, सामाजिक क्षेत्रात त्यांचे मोठे योगदान होते.
बोरगावकर यांनी 1999 मध्ये तुळजापूर विधानसभा निवडणुक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडुन लढवली होती, त्याचा त्यावेळी 3 हजार 787 मतांनी निसटता पराभव झाला होता. त्यावेळी मधुकरराव चव्हाण हे काँग्रेस पक्षाकडुन 30 हजार 151 मते घेऊन विजयी झाले होते.
बोरगावकर यांच्या पश्चात माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष उल्हास बोरगावकर व दोन मुली असा परिवार आहे. त्यांच्या निधनाने शैक्षणिक क्षेत्रातील साहेब हरपला अशी प्रतिक्रिया व्यक्त होत आहे त्यांच्या निधनाने तालुका तसेच शैक्षणिक क्षेत्रावर शोककळा पसरली आहे. त्यांनी खास करुन ग्रामीण भागातील सर्वसामान्य गोरगरीब वर्गातील मुलांना खास करुन मुलींना ग्रामीण भागात शिक्षणाची दारे खुली करून दिली.
नरेंद्रजी बाबुराव बोरगांवकर – माजी आमदार
हैद्राबाद मुक्ती संग्रामामधील हुमात्मे अॅड. बाबुराव गोपाळराव बोरगांवकरयांचे सुपूत्र असलेल नरेंद्र बोरगावकर यांचा जन्म 13 जून 1938 झाला असून आहे. बी. ए. एलएलबी (उस्मानिया विद्यापीठ, हैद्राबाद) ची पदवी घेतली. 1949 साली अपसिंगा येथील नरेंद्र आर्य शिक्षण संस्था काढली व त्यावर प्रसारक मंडळावर अध्यक्ष पदी कार्यरत आहेत.येथे जवळपास दरवर्षी 700 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. 1970 साली नळदुर्ग येथे बालाघाट शिक्षण संस्था स्थापन केली. या संस्थेवर संस्थापक सचिव म्हणून कार्यरत आहेत.
सदर बालाघाट शिक्षण संस्था अंतर्गत नळदुर्ग येथे कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय व तुळजापूर येथे यशवंतराव चव्हाण महाविद्यालय असून येथे कनिष्ठ व वरीष्ठ महाविद्यालये असून या ठिकाणी पदव्यूत्तरपदवी शिक्षणाची सोय आहे. या दोन्ही महाविद्यालयात दरवर्षी 6000 पेक्षा जास्त विद्यार्थी शिक्षण घेत आहेत त्यापैकी जवळपास दरवर्षी 100 पेक्षा जास्त विद्यार्थी विविध विषयावर संशोधन करीत आहेत. 1989 साली जीवन विकास शिक्षण संस्था,तुळजापूर. स्थापन करण्यात आली या संस्थेअंतर्गत 1 ली ते 10 पर्यंतचे शिक्षण उपलब्ध करुन देण्यात आली असून आज रोजी तुळजापूर येथे कन्याशाळा तसेच नळदुर्ग, गंधोरा, कार्ला, देवकुरळी, केमवाडी, पिंपळा (खुर्द) बोळेगांव येथे संस्थेची विद्यालये असून त्यामध्ये अंदाजे 3500 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.
नरेंद्रजी बोरगांवकर यांनी भुषविलेली पदे :
नरेंद्रजी बोरगांवकर यांनी 1962 ची निवडणुक लढवुन पहिले पंचायत समितीचे सभापती बनण्याची बहुमान मिळवला व त्यांनी सलग 12 वर्ष सभापती पद भुषविले. 1974 साली उस्मानाबाद व लातूर एकत्रीत जिल्हा असताना जिल्हापरीषदेचे अध्यक्षपद भुषविले आहे.नळदुर्ग येथे श्री तुळजाभवानी शेतकरी सहकारी साखर कारखाना उभा केले व सलग 15 वर्ष अध्यक्षपद भुषविले. 1992 ते 93 या काळामध्ये साखर व्यवसायात काम करणाऱ्या उच्च अशा डेक्कन शुगर टेक्नॉलॉजी या संस्थेच्या अध्यक्षपदाचा बहुमानही त्यांना मिळाला. 1994 ते 96 या काळात महाराष्ट्र राज्य साखर कारखाना महासंघाच्या उपाध्यक्षपदी सलग दोन वर्ष कार्यरत राहिले. 1997 या काळात महाराष्ट्र राज्य साखर कारखाना महासंघाच्या अध्यक्ष म्हणून कार्यरत राहीले. बोरगांवकरांचे सहकार क्षेत्रातील काम पहाता त्यांनी 1997 ते 1998 भारत सरकारच्या साखर आयात निर्यात कॉरपरेशन या संस्थेवर सलग दोन वर्ष संचालक म्हणून कार्य केले. 1995 ते 2001 मध्ये उस्मानाबाद, लातूर, बीड स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूमध्ये बहुमतांनी निवडून येवून विधानपरिषदेचे प्रतिनिधीत्व केले. कै नरेंद्र बोरगावकर हे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांचे समर्थक होते तसेच आ मधुकर चव्हाण यांचे त्यांचाशी घनिष्ट संबध होते