धाराशिव – समय सारथी
राज्यातील 247 नगरपरिषदा व 42 नगरपंचायतींमधील सदस्य पदांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी मतदार यादी व मतदार केंद्राचा कार्यक्रम राज्य निवडणुक आयोगाने जाहीर केला आहे. 30 सप्टेंबर रोजी प्रभागांची अंतिम रचना प्रसिध्द करण्यात आल्यानंतर आता मतदार यादी कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. सुचना व हरकती नंतर 28 ऑक्टोबर रोजी प्रभाग निहाय अंतीम मतदान यादी प्रसिद्ध करण्यात येणार असुन 7 नोव्हेंबर रोजी मतदान केंद्राची यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे, त्यामुळे नगरपरिषद निवडणुका ह्या डिसेंबर महिन्यात होण्याची शक्यता आहे.

प्रभागनिहाय प्रारुप मतदार यादी 8 ऑक्टोबर रोजी प्रसिध्द करण्यात येणार आहे. प्रारूप मतदार यादीवर हरकती व सूचना 8 ऑक्टोबर ते 13 ऑक्टोबर या काळात दाखल करता येतील त्यानंतर 28 ऑक्टोबर रोजी अंतिम प्रभागनिहाय मतदार याद्या अधिप्रमाणित करुन प्रसिध्द केल्या जातील. त्यानुसार मतदान केंद्रांची यादी तयार करून ती 7 नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध केली जाईल.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी राज्य निवडणूक आयोग स्वतंत्रपणे मतदार यादी तयार करत नसून भारत निवडणूक आयोगाकडून तयार होणारी विधानसभेची मतदार यादी वापरण्यात येते. याकरिता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मतदानाचा संभाव्य दिनांक लक्षात घेऊन मतदार यादी तयार करण्यासाठी महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम 1965 च्या कलम 11 अन्वये एक विशिष्ट दिनांक (Cut off date) अधिसूचित केला जातो.
विधानसभा मतदार यादीत संबंधित नगरपरिषदा / नगरपंचायतींच्या हद्दीत समाविष्ट असलेल्या एकूण मतदारांची संख्या आण ि नगरपरिषदा / नगरपंचायतींसाठी तयार केलेल्या प्रभाग निहाय प्रारूप मतदार यादीतील मतदारांची एकूण संख्या समान असणे आवश्यक आहे