धाराशिव जिल्ह्यातील शाळांमध्ये एकाच दिवशी शिक्षक, विद्यार्थ्यांचा सामूहिक संकल्प
985 शाळा, 4 हजार 851 शिक्षक व 1 लाख 9 हजार विद्यार्थी सहभागी
धाराशिव – समय सारथी
महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभागाचा उपक्रम राबवीला जात आहे. या उपक्रमातून विद्यार्थी व विद्यालय यांच्यातील नातेसंबंध अधिक दृढ करून विद्यार्थ्यांच्या अनुशासन, राष्ट्रभक्ती, सामाजिक समरसता व शालेय जीवनातील नागरीकत्वाची जाणीव होणे, देशभक्ती हे उद्दिष्ट ठेवण्यात आले. विद्यार्थ्यांनी विद्यालयाचा गौरव, राष्ट्राची उन्नती व सामाजिक समरसता , राष्ट्रभक्ती साधण्याचा संकल्प करून घेतला. या संकल्प अभियानाला राज्यातील सर्व माध्यमाच्या सर्व शाळेतील मुख्याध्यापक शिक्षक विद्यार्थी व पालकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदविला व या संघटनेच्या नवो उपक्रमाचे स्वागत करून अभिनंदन केले .

याचवेळी एकाच दिवशी प्रत्येक शाळेमध्ये संस्कारक्षम नागरिक, देशभक्त नागरिक निर्माण करण्याचा तसेच सर्व विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी मिळून आपल्या विद्यालयाचा, राष्ट्राचा आणि समाजाचा गौरव वाढविण्याची शपथ घेतली .
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ग्राम विकास मंत्री जयकुमार गोरे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे शालेय शिक्षण राज्यमंत्री डॉ पंकज भोयर यांनी सदर संकल्प अभियानाला शुभेच्छापत्र देऊन संघटनेच्या कार्याचे अभिनंदन केले .सदर उपक्रमासाठी माननीय शिक्षण आयुक्त व शिक्षण संचालक यांनी पूर्ण राज्यभर प्रत्येक शाळेमध्ये हा उपक्रम राबवण्याचे आदेश पारित केले . सर्व शिक्षणाधिकाऱ्यांनी याबाबतीत पत्र निर्गमित करून उपक्रम सर्व शाळेत राबविणे बाबत कळविले होते .
धाराशिव जिल्ह्यातील 985 शाळा सहभागी झाल्या तर 4 हजार 851 शिक्षक व 1 लाख 9 हजार विद्यार्थी सहभागी झाले. या संकल्प अभियानात सहभागी झालेल्या राज्यातील सर्व मुख्याध्यापक शिक्षक बंधू-भगिनींचे अखिल भारतीय राष्ट्रीय शैक्षिक महासंघ संलग्नित महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभागाचे प्रांताध्यक्ष मधुकर उन्हाळे, प्रांत कार्यवाह पुरुषोत्तम काळे,प्रांत सहकार्यवाह किशोर पिसे, धाराशिव जिल्हाध्यक्ष संभाजी भोसले, कार्यवाह राजाभाऊ हुकीरे, कोषाध्यक्ष सुरेश राऊत, संघटन मंत्री सुनील सूर्यवंशी, महिला आघाडी प्रमुख पल्लवी नलावडे, कार्याध्यक्ष विशाल जाधव, सतीश जाधवर, प्रशांत महाजन, अजय जानराव, सतीश कानडे, वसंत पाटील,शेषेराव चव्हाण, शिवाजी चव्हाण, गौरीशंकर कलशेट्टी, सुरेश दुधाळ, गणेश राठोड, दत्ता राठोड, ज्ञानेश्वर केवळराम, दयानंद पवार, प्रदीप नलावडे, सचिन हुलसुलकर,आदींनी आभार मानले आहेत.