धाराशिव = समय सारथी
भुम तालुक्यातील पाटसांगवी येथे एका तरुणाचा चाकूने भोकसून खुन झाल्याची घटना घडली होती, या घटनेचा लोकसभा निवडणुक व मतदानाचा कोणताही संबंध नसल्याचे प्रसिद्धी पत्रक पोलीस विभागाने काढले आहे. समाधान पाटील असे मयत तरुणाचे नाव असुन हा खुन वयक्तिक कारणावरून झाल्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी गौरीप्रसाद हिरेमठ यांनी कळविले आहे. पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी स्वतः घटनास्थळी जाऊन भेट देत चौकशी केली.
या खुन प्रकरणात अनेक तर्कवितर्क लावत राजकीय आरोप प्रत्यारोप सुरु होते मात्र पोलिसांनी प्रसिद्धी पत्रक काढले आहे.